*लाखापूर फॉरेस्ट येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*लाखापूर फॉरेस्ट येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा*
*लाखापूर फॉरेस्ट येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा*
तळोदा(प्रतिनिधी):-तालुक्यातील लाखापुर फॉरेस्ट येथील माध्यमिक विद्यालयात मोठ्या उत्साहात शिस्तबद्धपणे आणि आनंदमय वातावरणात आंतरराष्ट्रीय योग दिवस मुख्याध्यापक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी योगाचे महत्त्व तसेच मन आणि शरीर यातील सहसंबंध सांगत विद्यार्थ्यांची सुसंवाद साधून योगाच्या शास्त्रीय बाजूचे विवेचन केले. विवेचनात म्हटले की योग ही केवळ शारीरिक क्रिया नसून ती मन शरीर आणि आत्मा यांच्या समन्वय साधणारी शिस्त आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात योग्य केल्याने तणाव मुक्त जीवन जगता येते. तसेच जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शारीरिक शिक्षक संजय पाटील विनोद राणे यांनी विविध योगासने व प्रात्यक्षिक करून दाखवले त्यानंतर सर्व विद्यार्थी व शिक्षक यांच्याकडून योगाची विविध आसने करून घेतली. आसनात ग्रीवाचलन ,स्कंद, खिचाव, कटी शक्ती संचालन, घुटना संचालन, ताडासन, वृक्षासन अर्धचक्रासन त्रिकोणासन, दंडासन, भद्रासन, वज्रासन, शशिकासन, कपालभाती, भुजंगासन, श्वासन, प्राणायाम, अनुलोम विलोम, ध्यानधारणा, ओमकार धून, आसन मानेच्या हालचाली, हाताच्या हालचाली पायाच्या हालचाली, सूर्यनमस्कार इत्यादी योगाचे प्रकार करून घेतले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवत स्वतःची योगाचटई आणत आनंदाने योगासने केली. याप्रसंगी संजय पाटील यांनी विविध प्रकारचे योगासने सादर करून उपस्थित विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना योग अभ्यासाचे महत्त्व पटवून दिले. तसेच विनोद राणे यांनी शारीरिक व मानसिक आरोग्याचे संतुलनाचे महत्त्व समजावले. आणि योगाच्या नियमित सरावाने मनाची शांती आरोग्य या दोन्ही बाबी प्राप्त होऊ शकतात हे उलगडून सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना योगाचे आपल्या जीवनातील महत्त्व फायदे तसेच नियमित योग अभ्यास केल्याने आपले स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी योग्य अभ्यासात सहभागी होऊन योग दिनाच्या अनुभव घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये योगा विषयी जागरूकता वाढली असून सर्वांनी नियमित योग सरावाच्या संकल्प केला आहे. जागतिक योग दिवस यशस्वी साठी मुख्याध्यापक योगेश पाटील, उपशिक्षक संजय पाटील, विनोद राणे, मंगल पावरा, चांदो पाडवी, फिरोजअली सय्यद, अनिल भामरे, सुवर्णा कोळी, विजय पवार, सागर पाडवी आदींनी योग दिनाचे परिश्रम घेतले.



