*काठी येथे सामाजिक सभागृहाचे आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्याहस्ते भूमिपूजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*काठी येथे सामाजिक सभागृहाचे आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्याहस्ते भूमिपूजन*
*काठी येथे सामाजिक सभागृहाचे आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्याहस्ते भूमिपूजन*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत काठी येथे हजरत सय्यद शाह कादरी बाबा यांच्या दर्ग्याजवळ 20 लाखाचा निधीतून सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन शिवसेना नेते, आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. हजरत सय्यद शाह कादरी बाबा यांचा दर्गा हे या परिसरातील एक प्रमुख आणि ऐतिहासिक श्रद्धास्थान असून, हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजातील भाविक अत्यंत आदराने भेट देतात. या ठिकाणी बाबांच्या दरवर्षी उर्स मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असल्यामुळे सामाजिक सभागृहाच्या चांगला उपयोग होणार असल्याची भावना शिवसेना नेते, आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी केली. यावेळी शिवसेनेचे जेष्ठ पदाधिकारी विजय पराडके,माजी जि. प सदस्य सी.के पाडवी, नगरसेवक परवेज खान, युवा सेना जिल्हाप्रमुख योगेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.



