*बामखेडे त.त.येथे जागतिक योगदिन उत्साहात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बामखेडे त.त.येथे जागतिक योगदिन उत्साहात साजरा*
*बामखेडे त.त.येथे जागतिक योगदिन उत्साहात साजरा*
शहादा(प्रतिनिधी):-ग्रामविकास संस्था, बामखेडे त. त. संचलित कला व विज्ञान महाविद्यालय, अ. सू. पटेल प्राथमिक विद्यामंदिर, पुष्पावती मदन चौधरी माध्यमिक विद्यालय तसेच इंदास हरी पटेल उच्च माध्यमिक विद्यालय येथे 21 जून रोजी जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रा. डाॅ पी. जी. पटेल यांच्या प्रास्ताविकेने झाली. यानंतर योगशिक्षक बी. एन. पटेल यांनी योगप्रार्थना सादर करून योगाचे महत्त्व विशद केले. तसेच पी. एस. पाटील यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानाच्या पद्धतींचे प्रात्यक्षिक करून दाखविले. उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, पालक व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत योगासने व प्राणायामाचा सराव केला. या कार्यक्रमास कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील, मुख्याध्यापक आर. एस. चौधरी, पर्यवेक्षक ए. बी. चौधरी,योगशिक्षक बी. एन. पटेल, पी. एस. पाटील, महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यालयातील शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने सहभागी होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी नियमित योगाभ्यास करून निरोगी, सुदृढ व संतुलित जीवन जगण्याचा संकल्प केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण झाली असून आरोग्य, शिस्त आणि सकारात्मकतेचा संदेश संपूर्ण परिसरात पोहोचला.



