*देवरे विद्यालयात विश्व योगादिन संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*देवरे विद्यालयात विश्व योगादिन संपन्न*
*देवरे विद्यालयात विश्व योगादिन संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तालुक्यातील धंगाई विधायक कार्य मंडळ संचलित आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथे जागतिक योग दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. डी.साळुंके यांनी विश्व योगा दिनाचे महत्त्वासह पार्श्वभूमी प्रास्ताविकेतून व्यक्त केली. प्रार्थना, सूक्ष्म व्यायाम,ग्रीव्हा चालन, स्कंध संचालन, कटी, घुटना संचालन, उभे, बैठे, पाठीवरील व पोटावरील झोपून करावयाचे विविध योगासने प्रात्यक्षिकांद्वारे सादर करण्यात आले. यानंतर कपालभाती (प्राणायाम), अनुलोम -विलोम, शीतली प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, ध्यान, संकल्प, शांतीपाठाद्वारे समारोप करण्यात आला. योगासन प्रात्यक्षिकांसह उपयुक्तता उपशिक्षक डी.बी. भारती यांनी तर कु.कार्तिका साळुंके, मानसी पाटील, जितेंद्र पाटील, सोहम ठाकूर या विद्यार्थ्यांनी सर्व योगासनांचे प्रात्यक्षिक सादर केले. योग शिबिर यशस्वीतेसाठी सी.व्ही.नांद्रे एम. डी.नेरकर, वाय. डी. बागुल, डॉ. आर. आर. बागुल, एम.एस. मराठे, ए. एस.बेडसे,एस.एचगायकवाड, व्ही. बी.अहिरे, डी.बी पाटील, एस.जी. पाटील, एच.एम. खैरनार यांनी परिश्रम घेतले.



