*इमिनन्स पावर पब्लिक स्कूल( इपीपीएस)मध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*इमिनन्स पावर पब्लिक स्कूल( इपीपीएस)मध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा*
*इमिनन्स पावर पब्लिक स्कूल( इपीपीएस)मध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील इमिनन्स पावर पब्लिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी योगशिक्षिका कु. ममता वळवी यांनी विद्यार्थ्यांना योगाचे मानवी जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व समजावून सांगितले. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्य सुदृढ राहते तसेच एकाग्रता, आत्मविश्वास व सकारात्मकता वाढण्यास मदत होते, असे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
यानंतर कु. ममता वळवी यांनी विविध योगासने, प्राणायाम व ध्यान यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थी व शिक्षिकांना मार्गदर्शन केले. शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांनी सामूहिक योग साधना करून योग दिनाचा संदेश आत्मसात केला.
कार्यक्रमात शाळेच्या प्राचार्या सौ. शीतल घुगे यांनी योगाच्या माध्यमातून निरोगी व संतुलित जीवन जगण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच समुपदेशक सौ. आकांक्षा तिवारी यांनी विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य व तणावमुक्त जीवनासाठी योगाचा अवलंब करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सौ. मनीषा गावित, जयश्री आव्हाड, धनश्री पाटील, शुभांगी गव्हाणे, सानिया मिर्झा, मानसी पवार, निकिता पवार, तृप्ती वसावे, दीपाली माळी आणि सुवर्णा गुरव यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी "योग करा, निरोगी रहा" हा संदेश देत नियमित योगाभ्यास करण्याचा संकल्प केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण झाली असून संपूर्ण शाळा परिसर उत्साहाने भारावून गेला.



