*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे योग दिवस साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- ठळक बातम्या
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे योग दिवस साजरा*
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे योग दिवस साजरा*
तळोदा(प्रतिनिधी):-21जून 2026 रोजी माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस मुख्याध्यापक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने साजरा करण्यात आला. योग हे एक प्राचीन भारतात उगम पावलेले अध्यात्मिक आणि शारीरिक शास्त्र आहे. त्याला जगभरात मान्यता मिळावी. त्यासाठी
संयुक्त राष्ट्र संघाकडे प्रस्ताव देण्यात आला की 21जून हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. त्यामुळे या दिवसाला आंतरराष्ट्रीय योग दिवस घोषित करावा. त्याला जगभरातील 177 सदस्यांनी
या प्रस्तावाला पाठिंबा दिला.
आणि 21 जून 2015 पासून योग दिवस सर्वत्र साजरा करण्यात येतो. यावेळी विद्यालयात विविध योगासने
करण्यात आले. योगामुळे शरीर, मन शांत राहते आणि विविध रोगापासून मुक्ती मिळते. यावेळी शीर्षासन, पद्मासन, चक्रासन, वृक्षासन, तसेच
कपालभाती, ताडसन असे विविध योगदानाचे प्रकार विद्यालयाच्या प्रांगणात सादर करण्यात आले. त्यात विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी आनंदाने सहभाग घेतला. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक उमेश पाटील तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



