*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा*
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शकुंतला पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर करून योगाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी विद्यार्थ्यांना योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते, तसेच दैनंदिन जीवनात सकारात्मकता वाढते, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या सहभागाचे व उल्लेखनीय कामगिरीचे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती योगिता गणेश पाटील आणि सचिव गणेश गोविंद पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज मोतीलाल चौधरी यांनी कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करून निरोगी व संतुलित जीवनशैली अंगीकारण्याचा संकल्प केला. या उपक्रमामुळे महाविद्यालय परिसरात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आणि विद्यार्थ्यांना आरोग्यपूर्ण जीवन जगण्याची प्रेरणा मिळाली.



