*वयाच्या 19 व्या वर्षी मुंबई पोलीसात भरती झालेल्या कु. समीक्षा जयराम बेर्डे हिचा दवंडेवाडीतर्फे नागरी सत्कार सोहळा संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*वयाच्या 19 व्या वर्षी मुंबई पोलीसात भरती झालेल्या कु. समीक्षा जयराम बेर्डे हिचा दवंडेवाडीतर्फे नागरी सत्कार सोहळा संपन्न*
*वयाच्या 19 व्या वर्षी मुंबई पोलीसात भरती झालेल्या कु. समीक्षा जयराम बेर्डे हिचा दवंडेवाडीतर्फे नागरी सत्कार सोहळा संपन्न*
दापोली(प्रतिनिधी):-रविवार दि. 14 जून 2026 रोजी नवतरुण सेवा मंडळ कोळबांद्रे दवंडेवाडी व आदर्श महिला मंडळ दवंडेवाडी तर्फे मुंबई पोलीस दलामध्ये नियुक्ती झालेल्या कु. समीक्षा जयराम बेर्डे हिचा जाहीर सत्कार करण्यात आला. कष्टकरी घरात जन्माला आलेल्या आणि प्रचंड मेहनतीने वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी मिळविलेले यश म्हणजे मुंबई पोलीस दलात तीची झालेली नियुक्ती. खरे तर हे यश कुटुंब आणि वाडी बरोबरच संपूर्ण गावाचे नाव उंचविणारे आहे आणि या यशाचा गौरव म्हणून मंडळाच्या वतीने शाल, सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच या वेळी दिवा शहरातील कुणबी समाजातर्फे सुद्धा समीक्षाला सन्मानित करण्यात आले. यावेळी तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी महिला मंडळाकडून केक कापून समीक्षाचा आनंद द्विगुणित करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र दाजी खळे, सचिव मंगेश रामचंद्र दवंडे, खजिनदार वसंत नारायण दवंडे, महिला मंडळ संघटिका अर्चना खळे, अध्यक्षा वर्षा खळे, कुणबी संघटनेचे बबन सकपाळ, सुनील आग्रे, नितीन लोखंडे, दिलीप शिगवण, राजेश चिनकटे त्याचबरोबर गणेश दवंडे, दिनेश दवंडे, रामचंद्र बेर्डे, राजेश बेर्डे, नितीन दवंडे, यशवंत खळे, गंगाराम खळे, शैलेश दवंडे, विश्वास दवंडे, महेंद्र दवंडे, संजय दवंडे, सतिश खळे, अक्षय बेर्डे, संदेश दवंडे आणि योगिता जयराम बेर्डे, स्मिता वसंत दवंडे, श्रृती यशवंत खळे, साक्षी राजेश बेर्डे, प्राची गणेश दवंडे, सान्वी सतिश खळे उपस्थित होते.



