*माझं गाव, आरोग्य संपन्न गाव अभियानाची कार्यशाळा अक्कलकुवा येथे तहसील कार्यालयात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*माझं गाव, आरोग्य संपन्न गाव अभियानाची कार्यशाळा अक्कलकुवा येथे तहसील कार्यालयात संपन्न*
*माझं गाव, आरोग्य संपन्न गाव अभियानाची कार्यशाळा अक्कलकुवा येथे तहसील कार्यालयात संपन्न*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री यांचे महत्वाकांक्षी अभियान असुन या अभियानाच्या माध्यमातून सर्वांना सुआरोग्य लाभावे तसेच आरोग्याच्या सेवा सुरळीत आणि जलद व्हाव्या यासाठी सर्वांचे प्रयत्न खुप महत्वाचे आणि गरजेचे असल्याचे प्रतिपादन अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदार संघाचे आमदार आमश्या पाडवी यांनी केले.
महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय अक्कलकुवा यांच्या संयुक्त विद्यमाने माझं गाव, आरोग्य संपन्न गाव अभियानाची कार्यशाळा अक्कलकुवा येथे तहसील कार्यालयात संपन्न झाली. याप्रसंगी आमदार आमश्या पाडवी बोलत होते. या कार्यशाळेचे उदघाट्न अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदार संघाचे आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते देवमोगरा माता यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण तसेच दिप प्रज्वलन करुन करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन गट विकास अधिकारी विजय अहिरे, सिनेट सदस्य प्रा. डॉ.दिनेश खरात, यशवंत नाईक, रविंद्र पाडवी, रवी चंदेल, आमदार आमश्या पाडवी यांचे स्विय्य सहाय्यक रविंद्र गुरव, सुधीरकुमार ब्राम्हणे आदी उपस्थित होते.



