*नंदुरबार येथे चित्रकथी-हरदास समाजाच्या जात वैधता प्रश्नावर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथे चित्रकथी-हरदास समाजाच्या जात वैधता प्रश्नावर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न*
*नंदुरबार येथे चित्रकथी-हरदास समाजाच्या जात वैधता प्रश्नावर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):—नंदुरबार जिल्ह्यातील चित्रकथी हरदास समाजातील विद्यार्थी व नागरिकांना जात वैधता प्रमाणपत्र (Cast Validity) मिळवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार येथील सर्किट हाऊस येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत समाजाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. चित्रकथी व हरदास ही जात एकच असून त्याबाबत शासनाचा स्पष्ट निर्णय अनुकूल असतानाही स्थानिक स्तरावर प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ होत असल्याची गंभीर बाब बैठकीत मांडण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तसेच नागरिकांचे प्रशासकीय कामकाज अडचणीत येत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या प्रश्नाच्या पाठपुराव्यासाठी अखेर चित्रकथी समाजाचे जिल्हाध्यक्ष जगदीश चित्रकथे तसेच विमुक्त, भटक्या जनजाती विकास परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अनिल फड यांच्या विशेष प्रयत्नातून ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस नवी दिल्ली येथील नीती आयोगाचे सदस्य दादा इदाते यांनी विशेष उपस्थिती लावून समाजाच्या समस्या जाणून घेतल्या.
टोकरतलाव रोडवरील शासकीय विश्रामगृह अर्थात सर्किट हाऊस येथे संपन्न झालेल्या या बैठकीत संबंधित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर योग्य तो पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दादा इदाते यांनी दिले. समाज बांधवांनीही शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.



