*संत सेना एज्युकेशन फाउंडेशनतर्फे विद्यार्थी गुणगौरव, शैक्षणिक साहित्य,शिष्यवृत्ती व सायकल वितरण सोहळा उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*संत सेना एज्युकेशन फाउंडेशनतर्फे विद्यार्थी गुणगौरव, शैक्षणिक साहित्य,शिष्यवृत्ती व सायकल वितरण सोहळा उत्साहात संपन्न*
*संत सेना एज्युकेशन फाउंडेशनतर्फे विद्यार्थी गुणगौरव, शैक्षणिक साहित्य,शिष्यवृत्ती व सायकल वितरण सोहळा उत्साहात संपन्न*
शहादा(प्रतिनिधी):-संत सेना एज्युकेशन फाउंडेशन, शहादा व नंदुरबार यांच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव, शैक्षणिक साहित्य, शिष्यवृत्ती व सायकल वितरण सोहळा मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.रामदेवबाबा नगर येथील श्री संत सेना नाभिक समाज भवन प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाभिक समाज पंच मंडळाचे अध्यक्ष उद्धव जांभळे, उद्घाटक म्हणून आ. राजेश पाडवी तर प्रमुख अतिथी म्हणून उपनगराध्यक्षा माधवी पाटील, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाटील, परेश पटेल, गिरीश महाले, संदीप रघुवंशी, नगरसेविका ममता पवार, लताबाई शिवदे, पाणीपुरवठा सभापती प्रदीप ठाकरे, नगरसेवक हरीश पाटील, भूषण पवार, विजय सोनवणे, भानुदास वाघ, संजय जांभळे, गणेश पाटील, प्रकाश जाधव, प्रा. डॉ. अनिल साळुंके, डॉ. जितेंद्र जाधव, संत सेना एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. सुभाष सोनवणे, सचिव अशोक जाधव, ज्ञानेश्वर जाधव, रवींद्र सोनवणे यांच्यासह समाज पंच मंडळाचे पदाधिकारी, समाज बांधव व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रारंभ उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते सरस्वती माता, संत सेना महाराज आणि लिंबच माता यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे तसेच मातृ- पितृछत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि सायकली वितरण करून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीस बळ देण्याचा स्तुत्य प्रयत्न करण्यात आला. उद्धव जांभळे म्हणाले की, "समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. संत सेना एज्युकेशन फाउंडेशनने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सुरू केलेला हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असून भविष्यात अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारा ठरेल. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबता कामा नये, हीच या उपक्रमामागील खरी प्रेरणा आहे." नगरसेविका ममता पवार यांनी, " यश हे कोणत्याही शॉर्टकटने मिळत नाही. त्यासाठी कठोर परिश्रम, शिस्त, सातत्य आणि सकारात्मक विचार आवश्यक असतात. आजचे विद्यार्थी हे उद्याचे शास्त्रज्ञ, प्रशासक, शिक्षक, उद्योजक आणि राष्ट्रनिर्माते आहेत. आपल्या ज्ञान, कर्तृत्व आणि संस्कारांच्या बळावर समाज व राष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान द्यावे, " असे प्रतिपादन केले. याप्रसंगी संत सेना एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. सुभाष सोनवणे, आशिष पवार, तेजस्विनी सोनवणे यांच्यासह विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमचे सूत्रसंचालन सुचिता पवार तर प्रस्ताविक व आभार सचिव अशोक जाधव यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजितेम सोनवणे, रमण सोनवणे, हरीश सोलंकी, प्रा. रवींद्र जाधव, प्रा. डॉ. उद्धव जाधव, भिलू जांभळे, मयुर बोरदेकर, ज्ञानेश्वर सोलंकी, पुरुषोत्तम कन्हैया, रवींद्र सूर्यवंशी, सुनील सूर्यवंशी, अमृत सोनवणे, जयेश सोनवणे, आरती नांदेडकर, अनिता जाधव यांच्यासह सर्व संचालकांनी विशेष परिश्रम घेतले.



