*तुळजा येथे प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*तुळजा येथे प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा*
*तुळजा येथे प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा*
तळोदा(प्रतिनिधी):-तालुक्यातील माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे शाळा प्रवेश कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यातील सर्व शाळा दि.15 जून 2026 पासून सुरू झाल्या. याचे औचित्य साधून शाळेत नव्याने प्रवेश करीत असलेल्या विद्यार्थ्याचे स्वागत करण्यासाठी
मुख्याध्यापक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने जय्यत तयारी करण्यात आली.
या कार्यक्रमात सुरुवातीला
सुसज्ज अशा बैलगाडीतून नवीन प्रवेशित विद्यार्थ्याची मिरवणूक काढण्यात आली. त्यात केंद्र प्रमुख
वायखर, तसेच संस्थेच्या सचिव ऋषिका गावित तसेच माजी जि. प.सदस्य श्रीमती सुनीता पवार, माजी प. स. सदस्य सीताराम रहासे, ग्रा. प. सदस्य विक्रम डुमकुल, तसेच ग्रा. प सदस्या श्रीमती
जमानाबाई तेली. तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच इ. पाचवीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तक, वह्या, पेन, पेन्सिल, रबर तसेच कलर बॉक्स
इ. शालेय उपयोगी साहित्य देत
त्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
तसेच या वर्षी इ.10 वी पास
झालेल्या विद्यार्थ्यांपैकी प्रथम पाच
विद्यार्थ्यांचा शालेय उपयोगी साहित्य देत पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच इ. 6 वी,7 वी,8 वी च्या विद्यार्थ्यांना
पाठ्यपुस्तक, वह्या, पेन, पेन्सिल रबर इ शैक्षणिक साहित्य मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी केंद्र प्रमुख वायखर यांनी विद्यार्थ्यांना दररोज शाळेत येण्याचे आवाहन केले. तसेच संस्थेच्या सचिव ताईसाहेब ऋषिका ताई यांनी
विद्यार्थ्यांना शिकाल तर टिकाल असे सांगितले. तर सीताराम रहासे यांनी आदिवासी बोलीभाषेत आपले मनोगत व्यक्त केले. तर मुख्याध्यापक उमेश पाटील यांनी
सांगितले की, या स्पर्धेच्या काळात
टिकायचे असेल तर शिक्षणाशिवाय
पर्याय नाही. असे सांगितले. तसेच शाळेचे ज्येष्ठ शिक्षक विलास मगरे यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना आंबारस, पुरी आणि
मसालेभात असे सकस जेवण देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र ढोडरे यांनी केले तर आभार संदीप मोरे यांनी व्यक्त केले. तर
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भील, पाडवी, राहुल साळुंखे, पंकज खेडकर, सुदाम जांभोरे तसेच संतोष राठोड, मोहन वळवी आणि सुबोध जावरे यांनी परिश्रम घेतले.



