*बैलगाडीतील स्वागत मिरवणुकीने विद्यार्थ्यांचा पहिला दिवस अविस्मरणीय, हिरा प्रतिष्ठानच्या शाळांमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात, सौ.अनिता चौधरी यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्श
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बैलगाडीतील स्वागत मिरवणुकीने विद्यार्थ्यांचा पहिला दिवस अविस्मरणीय, हिरा प्रतिष्ठानच्या शाळांमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात, सौ.अनिता चौधरी यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्श
*बैलगाडीतील स्वागत मिरवणुकीने विद्यार्थ्यांचा पहिला दिवस अविस्मरणीय, हिरा प्रतिष्ठानच्या शाळांमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात, सौ.अनिता चौधरी यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-हिरा प्रतिष्ठान संचलित काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी प्राथमिक विद्यामंदिर, सौ. इंदुबाई हिरालाल चौधरी प्राथमिक विद्यामंदिर, संस्कृती शिशु विहार व नूतन बालमंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या प्रारंभानिमित्त विद्यार्थ्यांचा भव्य प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात व आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला.
प्रवेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे सजविलेल्या बैलगाडीतून, टेडीबिअरच्या आकर्षक वेशभूषेसह आणि ढोल-ताशांच्या गजरात काढण्यात आलेली विद्यार्थ्यांची स्वागत मिरवणूक होय. या अनोख्या स्वागतामुळे विद्यार्थी, पालक आणि उपस्थित नागरिकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी हिरा प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा सौ. अनिता शिरीष चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय टप्पा असतो. शिक्षण हेच यशाचे खरे साधन असून जिज्ञासा, शिस्त आणि परिश्रम यांच्या बळावर विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून त्याच्या दिशेने वाटचाल करावी. नवीन शैक्षणिक वर्ष हे नव्या संधी, नव्या संकल्प आणि नव्या यशाची सुरुवात ठरो,” अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. शाळेत आगमन झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, पुष्प तसेच शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाचे औचित्य साधून केक कापून उद्घाटन करण्यात आले व सर्व विद्यार्थ्यांना केकचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास साई सूर्या कन्स्ट्रक्शनचे चेअरमन व सामाजिक कार्यकर्ते देविदास पुरुषोत्तम चौधरी, संस्थेचे सहसचिव महेंद्र यशवंत पाटील, शैलेश जैन, सहकार महर्षी अण्णासाहेब पी. के. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अनिल चौधरी, प्रभारी प्राचार्य प्रा.गणेश पवार, मुख्याध्यापक युवराज भामरे व किरण त्रिवेदी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश काटके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रुपेश चौधरी, सौ.पल्लवी चौधरी, श्रीमती नैना सोनवणे, सौ. अमिता नाईक, सौ. अपेक्षा पाटील, श्रीमती भारती मोरे, श्रीमती मोनिका राजपूत, रविंद्र चौधरी, शेखर पाटील, सुधाकर ठाकूर तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, पालकांचा उत्साह आणि शाळेच्या कुटुंबाने केलेले आत्मीय स्वागत यामुळे हा प्रवेशोत्सव सर्वांसाठी संस्मरणीय ठरला.



