*जिल्हा परिषद मराठी शाळा खांडबारा येथे प्रवेश उत्सव उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्हा परिषद मराठी शाळा खांडबारा येथे प्रवेश उत्सव उत्साहात संपन्न*
*जिल्हा परिषद मराठी शाळा खांडबारा येथे प्रवेश उत्सव उत्साहात संपन्न*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शाळा परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगून नियमित शाळेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व शालेय गणवेशांचे वाटप करण्यात आले. नवीन पुस्तके व गणवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच दिपाली गावित, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी माजी सरपंच अविनाश गावित, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष सागर पाडवी, उपाध्यक्ष तेजस्विनी वसावे, ग्रामस्थ महेंद्र पाडवी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन उज्ज्वल भवितव्य घडविण्याचा संदेश दिला. यावेळी मुख्याध्यापिका रंजना वळवी यांनी शाळेतील विविध उपक्रमांची माहिती देत पालकांनी मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षिका व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रवेश उत्सवामुळे शाळेच्या परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांनी नवीन शैक्षणिक वर्षाची आनंदाने सुरुवात केली.



