*शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न*
*शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-के. डी. गावित प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, गुजरभवाली येथे शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांची मिनी ट्रॅक्टरवरून ढोल ताशांच्या गजरात स्वागत मिरवणूक काढण्यात आली. गावातील प्रमुख मार्गांवरून काढलेल्या या मिरवणुकीमुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमा दरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन मनापासून स्वागत करण्यात आले. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, माता-पालक समितीचे सदस्य, पालकवर्ग तसेच शालेय कर्मचारीवृंद उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. विद्यार्थी व पालकांसाठी आकर्षक सेल्फी पॉईंट उभारण्यात आला होता. या सेल्फी पॉईंटवर विद्यार्थ्यांनी, पालकांनी व मान्यवरांनी छायाचित्रे काढून प्रवेशोत्सवाच्या आनंददायी क्षणांची आठवण जपली.



