*भारतीय जनता पार्टीच्या नंदुरबार शहराध्यक्षपदी छोटू मख्खू चौधरी यांची नियुक्ती*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*भारतीय जनता पार्टीच्या नंदुरबार शहराध्यक्षपदी छोटू मख्खू चौधरी यांची नियुक्ती*
*भारतीय जनता पार्टीच्या नंदुरबार शहराध्यक्षपदी छोटू मख्खू चौधरी यांची नियुक्ती*
नंदूरबार(प्रतिनिधी):-भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार भारतीय जनता पार्टीच्या नंदुरबार शहर मंडल अध्यक्षपदी छोटू मख्खू चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी पक्षाचे महामंत्री विजय चौधरी यांच्या हस्ते छोटू मख्खू चौधरी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. तसेच त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. नियुक्तीनंतर त्यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी, जिल्हा सरचिटणीस सदानंद रघुवंशी, कैलास चौधरी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. छोटू मख्खू चौधरी यांच्या नियुक्तीमुळे नंदुरबार शहरातील भाजप संघटनाला अधिक बळ मिळणार असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नव्या जबाबदारीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



