*शाळाबाह्य स्पर्धा परीक्षातून गुणवत्ता विकास शाळा कोंडिवळे गोतावडे शाळेतील विद्यार्थ्यांचे चौफेर यश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शाळाबाह्य स्पर्धा परीक्षातून गुणवत्ता विकास शाळा कोंडिवळे गोतावडे शाळेतील विद्यार्थ्यांचे चौफेर यश*
*शाळाबाह्य स्पर्धा परीक्षातून गुणवत्ता विकास शाळा कोंडिवळे गोतावडे शाळेतील विद्यार्थ्यांचे चौफेर यश*
ओणी(प्रतिनिधी):-राजापूर तालुक्यातील जि. प. प्रा. शाळा ओणी, कोंडिवळे गोतावडेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध शाळाबाह्य स्पर्धा परीक्षातून उज्ज्वल यश प्राप्त करत आपलं शाळेचं व गावाचं नाव उंचावलं आहे.
मंथन, ब्रेन डेव्हलपमेंट, सिंधुरत्न, मॅथ्स ऑलिम्पियाड, रंगोत्सव, राजापूर शिष्यवृत्ती या सर्व परीक्षात शाळेचा निकाल 100% लागला असून परीक्षेत प्रविष्ट झालेल्या सर्व मुलांनी गुणवत्ता प्राप्त केली आहे.
स्पर्धा परीक्षेतून विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास उत्तम होताना दिसत आहे. रंगोत्सव, क्रीडास्पर्धा, सहशालेय उपक्रमातूनही विद्यार्थी उत्स्फूर्त सहभागी होऊन आपल्या कौशल्याची चुणूक दाखवत आहेत. विदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता पूरक स्थिती निर्माण केली तर विद्यार्थी कोणत्याही परिस्थितीतून येऊ देत. खेडेगावातील असू देत आपल्या मेहनतीने नक्कीच चांगलं यश प्राप्त करतो. यासाठी विदयार्थ्यांची 100% उपस्थिती, नियमितपणा,अचूक मार्गदर्शन, सरावातील सातत्य, वैयक्तिक लक्ष, व पालकांचे सहकार्य असेल तरच अशा प्रकारचे यश मिळवता येते. या सर्व बाबी विचारात घेऊन त्या दिशेने वाटचाल केल्यामुळे शाळा प्रगतीपथावर आहे.जिल्हा परिषद सदस्य प्रतिक मटकर, सरपंच रविकांत मटकर, गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले, केंद्रप्रमुख रमेश सोगम व मंदरूळ केंद्रातील सर्व शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थ, नूतन विद्यामंदिर ओणीचे संस्था अध्यक्ष वासुदेव तुळसणकर, प्रदीप संसारे यांनी सर्व यशस्वी विदयार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षिका सौ. मुग्धा कुळये, सौ. आरती देसाई यांचे अभिनंदन केले आहे. विदयार्थ्यांच्या यशामुळे शाळेचा चांगला लौकिक झाला असून यामुळे या शाळेत दाखल करण्यासाठी पालक उत्सुक आहेत. यावर्षी शाळेचा पट वाढण्यासाठी फायदा झाला आहे. या शाळेच्या कु,मानस महेंद्र धावडे (2 री), कु. भार्गवी राजेंद्र मोहिते (2 री),कु. संस्कार संतोष शिगम -(4 थी), कु. दुर्वा संदिप गोतावडे (4 थी), कु. आर्यन सुरेश गोतावडे (3 री), कु. श्रीजीत मयुरेश साखळकर (2 री), कु.सृजा मयुरेश साखळकर (2 री), कु.शिवांश संदिप चौगुले (1 ली) कु. आरोही संतोष नेवरेकर (2 री) कु.शाहिद मुहम्मद शेख (2 री), कु. अनय हेमंत चौगुले (2 री), कु. अथर्व गणेश लाड (3री), कु. नेत्रा संदिप गोतावडे, कु. हिरण्या हेमंत चौगुले (4 थी) विद्यार्थ्यांनी मंथन, सिंधुरत्न, रंगभरण स्पर्धा, ब्रेन डेव्हलपमेंट, मॅथ्स ऑलिम्पियाड, राजापूर शिष्यवृत्ती परीक्षा आदी विविध परिक्षेतून सहभाग नोंदवत गोल्ड, सिल्व्हर, ब्राॅंन्झ मेडल अशा विविध मेडलची कमाई करत शाळेचे उज्वल केले आहे.



