*नंदुरबार जिल्ह्यातून देवरे विद्यालयातील विद्यार्थिनींना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनेला प्रारंभ*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्ह्यातून देवरे विद्यालयातील विद्यार्थिनींना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनेला प्रारंभ*
*नंदुरबार जिल्ह्यातून देवरे विद्यालयातील विद्यार्थिनींना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनेला प्रारंभ*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार तालुक्यातील आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथे राज्य परिवहन मंडळाचे,अहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेअंतर्गत 106 विद्यार्थिनींना देवरे विद्यालयात एस.टी. महामंडळाचे अधिकारी यांच्या हस्ते मुलींना मोफत पास योजनेचा प्रारंभ करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी वरदान ठरत आहे. अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना कार्यक्रमाला नंदुरबार आगाराचे व्यवस्थापक संदिप निकम, सहाय्यक वाहतूक नियंत्रक देवेंद्रसिंग सुर्यवंशी, वाहतुक नियंत्रक, चालक सुरेश महाजन यांच्या उपस्थितीत अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजनेंर्तगत विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुलींना थेट लाभ योजनेतून विद्यार्थीनीना पास वितरण करण्याचा ' विद्यालय
तेथे एस.टी.पास ' संकल्पनेचा शुभारंभ करण्यात आला. तत्पूर्वी विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी.साळुंके यांनी प्रास्ताविकातून एस.टी. योजनेचे महत्त्व, पंचक्रोशीतील नाशिंदे, खापरखेडा, बोराळा गावातून विद्यार्थी बसने ये-जा करतांना जाणवणाऱ्या समस्यांबाबत व एस.टी. महामंडळाच्या विविध प्रवासी योजनेतून विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन ते आज चांगले उच्च शिक्षण घेत आहेत. शिक्षण घेऊन काही उच्चस्तरीय पदावर पोहोचले आहेत.
नंदुरबार आगार व्यवस्थापक संदिप निकम यांनी सर्व अपडाऊन करणा-या विद्यार्थ्यांना
मार्गदर्शनपर सुचना देत नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात. एस.टी.लाभ देत असलेल्या योजनांची माहिती दिली. आपल्या पालकांपर्यंत राज्य परिवहन मंडळाच्या सुविधा आपण पोहोचवण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना निकम यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डी. बी.भारती तर आभार सी.व्ही. नांद्रे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एम.डी. नेरकर, वाय.डी.बागुल, डॉ.आर.आर.बागुल,एम.एस.मराठे,ए.एस.बेडसे,एस.एच.गायकवाड, व्ही.बी.अहीरे,डी.बी. पाटील, एस. जी. पाटील,एच. एम.खैरनार आदींनी संयोजन व सहकार्य केले.



