*शै.वर्षाच्या प्रथम दिनानिमित्त नवीन प्रवेशीत विद्यार्थ्यांचे थाटामाटात स्वागत*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शै.वर्षाच्या प्रथम दिनानिमित्त नवीन प्रवेशीत विद्यार्थ्यांचे थाटामाटात स्वागत*
*शै.वर्षाच्या प्रथम दिनानिमित्त नवीन प्रवेशीत विद्यार्थ्यांचे थाटामाटात स्वागत*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार तालुक्यातील आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथे नवीन शैक्षणिक वर्षानिमित्त प्रवेशोत्सव नाशिंदा, खापरखेडा, बोराळा विखरण गावातून इ.पाचवी विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते नवप्रवेशीत विद्याथ्यांचे औक्षण करून पेन, पुष्पगुच्छ, नोटबुक व पुस्तक संचासह शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
प्रवेशोत्सव कार्यक्रमासाठी नाशिंदे येथे पोलीस पाटील दिलीप भाईदास पाटील, अरुण पाटील, रमेश पाटील, भाईदास पाटील, लक्ष्मण पाटील, दिगंबर पाटील, संभाजी पाटील, भरत पाटील, रोहिदास पाटील, हिम्मत पाटील, संभाजी पाटील, गोविंद पाटील, तर बोराळा येथे रवींद्र कोळी, ज्ञानाबाई भिल, लिलाबाई भिल, संजय चित्ते, पावभा कोळी, अरविंद भिल, कुषाबाई भिल, कायबाई भिल, चंद्रशेखर कोळी, दिलीप पाटील, कुंदन ठाकरे, प्रकाश कोळी विखरण येथील पावभा पाटील, मनोहर लोहार तसेच राज्य परिवहन मंडळाचे विद्यालय तेथे पास योजनेसाठी विद्यार्थिनींना पास वितरण करण्यासाठी आलेले नंदुरबार आगाराचे प्रमुख संदीप निकम, सहाय्यक वाहतूक अधिकारी देवेंद्रसिंग सूर्यवंशी, वाहतूक नियंत्रक हितेश वसईकर, वाहक महाजन तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. डी.साळुंके या मान्यवरांच्या हस्ते इयत्ता पाचवी व इतर वर्गांच्या नवीन प्रवेशित बालकांचे औक्षण करून पेन, नोटबुक, शैक्षणिक पुस्तके इतर शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नंदुरबार राज्य परिवहन महामंडळाचे आगार प्रमुख संदीप निकम यांनी विद्यालयातील विविध उपक्रमांचे निसर्गरम्य परिसराचे कल शाळेचे कौतुक करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात. अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापक डी.डी. साळुंके यांनी आगामी शैक्षणिक वर्षासाठी असणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा उपक्रम याच्या आयोजना- नियोजनाविषयी मार्गदर्शन केले. तत्पूर्वी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना ट्रॅक्टरवर मिरवणूक काढुन वाजत-गाजत विविध घोषणांच्या गजरात स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षक डी.बी. भारती, सूत्रसंचालन वाय. डी.बागुल तर आभार सी.व्ही. नांद्रे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील उपशिक्षक एम. डी. नेरकर, एम. एस.मराठे, व्ही. बी.अहिरे, श्रीम. आर.आर,बागुल,
एस एच. गायकवाड, ए. एस. बेडसे तसेच शिक्षकेतर कर्मचारी डी.बी. पाटील, एस.जी. पाटील, एच.एम. खैरनार यांनी परिश्रम घेतले.



