ताजा खबरे:
*नंदुरबार तालुक्यातील सैताणे गावाला जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांची भेट, नागरिकांच्य समस्या जाणून घेत विकासकामांना गती देण्याचे निर्देश
*जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची अक्कलकुवा येथील जवाहर नवोदय विद्यालयास भेट*
*गोवा येथील सनातन आश्रमाला नाणीजधाम येथील जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांची सदिच्छा भेट, सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली-अनंत विभूषित जगद्ग
*घरमालक छतावर झोपला, अन् चोरांनी घर साफ केलं; मुलीच्या लग्नासाठी साठवलेली 1 किलो चांदीही लंपास*
*ओणीची सुकन्या परी जडयार ठरली बेस्ट फायटर*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जादूटोणा प्रतिबंधक कायद्यावर प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न, अंधश्रद्धा निर्मूलनाची सामूहिक शपथ*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जादूटोणा प्रतिबंधक कायद्यावर प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न, अंधश्रद्धा निर्मूलनाची सामूहिक शपथ*

  • Share:

*जादूटोणा प्रतिबंधक कायद्यावर प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न, अंधश्रद्धा निर्मूलनाची सामूहिक शपथ*
नंदुरबार(प्रतिनिधी):-अंधश्रद्धा, जादूटोणा आणि अघोरी प्रथांचे समाजातून उच्चाटन करण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन येथे एक विशेष प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. 'महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व काळी जादू प्रतिबंध व उच्चाटन अधिनियम, 2013' (जादूटोणा प्रतिबंधक कायदा) या विषयावर ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, अशी माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून आणि महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली. या कार्यशाळेला जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांमधील अधिकारी, कर्मचारी आणि सरकारी अभियोक्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते. कायद्याचे उद्दिष्ट आणि स्वरूप, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण समितीचे सरकारी अभियोक्ता भाईदास बिरारे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना या कायद्याच्या विविध पैलूंवर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी कायद्याच्या मुख्य उद्देशांवर प्रकाश टाकला, ज्यामध्ये खालील मुद्द्यांचा समावेश होता: अंधश्रद्धा व अमानुष प्रथांना आळा: समाजात चालणाऱ्या अंधश्रद्धा, जादूटोणा, काळी जादू, नरबळी आणि अमानुष प्रथा रोखणे.
फसवणूक व अत्याचार थांबवणे, सामान्य जनतेची होणारी आर्थिक व मानसिक फसवणूक थांबवणे आणि महिला, मुले व वृद्धांवर होणारे अत्याचार रोखणे.
वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार: लोकांच्या भीती आणि अज्ञानाचा गैरफायदा घेणाऱ्यांवर कडक कारवाई करणे आणि संविधानातील कर्तव्यानुसार वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे. हक्कांचे संरक्षण: मानवी प्रतिष्ठा आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करणे.
अनिष्ट प्रथांविरोधात तक्रार करण्याचे आवाहन, बिरारे यांनी कायद्याचे स्वरूप समजावून सांगताना स्पष्ट केले की, हा कायदा नरबळी, भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली केली जाणारी मारहाण, चमत्कारांचे खोटे दावे करून फसवणूक करणे, महिलांना डायन किंवा चेटकीण ठरवणे, अघोरी उपचार, जादूटोणा आणि साप चावल्यावर वैद्यकीय उपचार नाकारून झाडफूक करणे अशा सर्व अमानुष बाबींना कडक विरोध करतो. "आपल्या सभोवताली अशा घटना घडत असल्यास नागरिकांनी तात्काळ संबंधित पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी," असे आवाहनही त्यांनी केले. सामूहिक शपथ आणि सांगता, या कार्यशाळेदरम्यान जिल्ह्यातील उपस्थित सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत सामूहिक शपथ घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि कार्यशाळा संपन्न झाल्याचे घोषित केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नंदुरबार तालुक्यातील सैताणे गावाला जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांची भेट, नागरिकांच्य समस्या जाणून घेत विकासकामांना गती देण्याचे निर्देश
July, 14 2026
*जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची अक्कलकुवा येथील जवाहर नवोदय विद्यालयास भेट*
July, 14 2026
*गोवा येथील सनातन आश्रमाला नाणीजधाम येथील जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांची सदिच्छा भेट, सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली-अनंत विभूषित जगद्ग
July, 14 2026
*घरमालक छतावर झोपला, अन् चोरांनी घर साफ केलं; मुलीच्या लग्नासाठी साठवलेली 1 किलो चांदीही लंपास*
July, 14 2026
*ओणीची सुकन्या परी जडयार ठरली बेस्ट फायटर*
July, 14 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज