*चोरवणे गावचा सुपुत्र कुमार सार्थक उमेश जाधव हा नॉर्वे येथे बनला पायलट*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*चोरवणे गावचा सुपुत्र कुमार सार्थक उमेश जाधव हा नॉर्वे येथे बनला पायलट*
*चोरवणे गावचा सुपुत्र कुमार सार्थक उमेश जाधव हा नॉर्वे येथे बनला पायलट*
रत्नागिरी(प्रतिनिधी):-खेड तालुक्यातील चोरवणे गावातील उमेश सीताराम जाधव यांचा सुपुत्र कुमार सार्थक जाधव नॉर्वे येथे पायलट बनला आहे.गेली अनेक वर्ष उमेश सीताराम जाधव नॉर्वे येथे नोकरी निमित्त स्थायिक झाले आहेत.त्यांचा सुपूत्र कुमार सार्थक जाधव हा आपल्या प्रचंड मेहनतीने आणि कष्ठाने पायलट झाला आहे.सार्थकचे पुर्ण शिक्षण नॉर्वे येथे झाले आहे.पायलट होण्यासाठी ३ वर्षाचा कोर्स त्याने केला. लहानपणापासून पायलट होण्याचे स्वप्न होते ते स्वप्न पुर्ण करण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली.त्याच्या यशामध्ये वडील उमेश जाधव आणि आई मयुरी जाधव यांचे खूप मोठे योगदान आहे. सार्थक जाधव हा अवघ्या 20 वर्षांत पायलट झाला असुन चोरवणे गावासाठी तसेच पंधरागावासाठी अभिमानाची गोष्ट आहे.पायलट बनल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



