*स्थानिक युवकांच्या रोजगारासाठी स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीची विविध जिल्हाधिकारी कार्यालयांना निवेदने*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*स्थानिक युवकांच्या रोजगारासाठी स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीची विविध जिल्हाधिकारी कार्यालयांना निवेदने*
*स्थानिक युवकांच्या रोजगारासाठी स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीची विविध जिल्हाधिकारी कार्यालयांना निवेदने*
मुंबई(प्रतिनिधी):- राज्यातील स्थानिक युवकांना रोजगारामध्ये न्याय मिळावा आणि “राज्यातील 80% स्थानिक उमेदवारांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्याच्या शासन निर्णयाची” कठोर व प्रभावी अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी विविध जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये निवेदने सादर करण्यात आली. संघटनेचे पदाधिकारी अमरीश पाथरे यांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे, ॲड. सुदाम माने यांनी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे तसेच विजय औटी यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय, प्रमोद मसुरकर यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊन संघटनेतर्फे संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
महाराष्ट्रातील स्थानिक मराठी युवकांमध्ये वाढती बेरोजगारी ही गंभीर समस्या बनत असताना अनेक ठिकाणी शासन निर्णयांचे उघड उल्लंघन होत असल्याची बाब संघटनेने या निवेदनातून निदर्शनास आणून दिली आहे. स्थानिक युवकांना त्यांच्या हक्काचा रोजगार मिळावा शासन निर्णय केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात प्रभावीपणे राबविण्यात यावा तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे.लवकरच संघटनेचे अध्यक्ष प्रमोद मसूरकर व रोजगार प्रमुख मिलिंद प्रधान यांच्या पुढाकाराने एक शिष्टमंडळ उद्योग विकास आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या भेटी घेऊन याबाबत चर्चा करण्यात येणार असून शासन निर्णयात काही दुरुस्त्या सुचविणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष प्रमोद मसूरकर यांनी सांगितले.



