*7 वर्षीय प्रनिका प्रफुल्ल पाटीलची दुहेरी विक्रमी कामगिरी; इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि नॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*7 वर्षीय प्रनिका प्रफुल्ल पाटीलची दुहेरी विक्रमी कामगिरी; इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि नॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद*
*7 वर्षीय प्रनिका प्रफुल्ल पाटीलची दुहेरी विक्रमी कामगिरी; इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि नॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद*
नंदुरबार(प्रतिनिधी):-अवघ्या सातव्या वर्षी प्रनिका प्रफुल्ल पाटील हिने आपल्या असामान्य बुद्धिमत्ता, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अवघ्या 3 मिनिटे 39 सेकंदांत 120 अॅबॅकस प्रश्न सोडवून तिने दुहेरी विक्रम प्रस्थापित केला असून तिच्या या कामगिरीची नोंद India Book of Records तसेच National Book of Records मध्ये करण्यात आली आहे. प्रनिकाच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ व जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांच्या हस्ते तिचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी मा शिक्षणमंत्री आमदार अमरीश पटेल, शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेशजी पाडवी, अक्कलकुवा मतदार संघाचे आमदार आमश्या पाडवी, जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष डॉ अभिजीत मोरे, भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राम रघुवंशी मान्यवर उपस्थित होते.
तिच्या ह्या यशाबद्दल अखिल भारतीय गुर्जर महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष बापूसाहेब दिपक पाटील, जि प मा अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित, DySP दत्ता पवार, शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील, जि प मा सभापती हेमलता शितोळे, शहादा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष माधवी पाटील, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या प्रतिभा शिंदे, शहादा नगर परिषदेचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी, नंदुरबार शहर पोलीस निरीक्षक निलेश देसले, शहादा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे प्रांत कार्यवाह पुरुषोत्तम काळे, सहकार्यवाह राकेश आव्हाड, जिल्हाध्यक्ष नितेंद्र चौधरी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तिचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रनिकाच्या या अभूतपूर्व यशामुळे तिच्या कुटुंबीयांसह नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अत्यंत कमी वयात मिळवलेले हे यश तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात असून ती अनेक बालकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. प्रनिका ही औरंगपूर येथील प्रगतशील शेतकरी सुरेश गिरधर पाटील यांची नात असून शहादा येथील शल्यचिकित्सक डॉ. प्रफुल्ल पाटील यांची कन्या आहे. तिच्या या दुहेरी विक्रमी कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



