*प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या 52 वर्ष तपपूर्ती व जून महिन्याच्या आगामी कार्यक्रमाच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी विविध कार्यक्रमांचे योग्य नियोजन करावे असे आवाहन भाजपा उत्तर म
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या 52 वर्ष तपपूर्ती व जून महिन्याच्या आगामी कार्यक्रमाच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी विविध कार्यक्रमांचे योग्य नियोजन करावे असे आवाहन भाजपा उत्तर म
*प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या 52 वर्ष तपपूर्ती व जून महिन्याच्या आगामी कार्यक्रमाच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी विविध कार्यक्रमांचे योग्य नियोजन करावे असे आवाहन भाजपा उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी यांनी भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वैठकीत केले* नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील पीजी अँड सन्स रिसॉर्ट या हॉटेलमध्ये आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर आमदार अनुप अग्रवाल, आमदार राजेश पाडवी, जिल्हाध्यक्ष निलेश माळी, प्रभारी बबनराव चौधरी, समिधा नटावदकर, सदानंद रघुवंशी, कैलास चौधरी, सत्यानंद गावित, सुप्रिया गावित आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विजय चौधरी म्हणाले की, देशातील गरीब शोषित वंचित घटकांच्या कल्याणासाठी आदिवासी, दलित, व्यापारी, विद्यार्थी,महिला व युवक यांच्या प्रगतीसाठी विकसित भारताचा संकल्पना घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनकल्याणकारी योजना सुरु केल्या आहेत. वैयक्तिक लाभाच्या व सार्वजनिक विकासाच्या योजना अतिशय प्रभावीपणे राबवल्या. गतिमान व भ्रष्टाचार मुक्त प्रशासन ही ओळख निर्माण केली. जगात भारताचे नाव लौकिक केले. त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकार ला बारा वर्ष पूर्ण झाल्याने नरेंद्र मोदी यांनी केलेले ऐतिहासिक कार्य जनमाणसापर्यंत पोहोचवण्याची भूमिका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अदा करावी अशी देखील विनंती चौधरी यांनी केली. जून महिन्यात होणाऱ्या कार्यक्रमाच्या पाश्वभूमीवर मीडिया संवाद विशेष जनसंपर्क अभियान, कल्याण शिबिर, व्यापारी संवाद, संमेलन, मोदी सरकारच्या उपलब्धीचे प्रदर्शन, नैसर्गिक शेती कार्यशाळा, जागतिक पर्यावरण दिन, आंतरराष्ट्रीय योग दिन, आणीबाणीचे 51 वर्ष याविषयी विविध कार्यक्रमांचे आयोजन कार्यकर्त्यांनी करावे. मंडळ अध्यक्ष पासून ते मोर्चाचे अध्यक्ष व आघाडीचे अध्यक्ष यांनी विविध कार्यक्रमांची जबाबदारी स्वीकारून एक नवा विक्रम करावा, अशा प्रकारची विनंती विजय भाऊ चौधरी यांनी केली. बैठकीची सुरुवात वंदे मातरम व महाराष्ट्र गीताने झाली तर समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. याप्रसंगी बारा वर्षे तपपूर्ती संदर्भात आमदार अनुप अग्रवाल यांनी निवेदन सादर केले तर प्रस्तावना जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांनी मांडली आभार कैलास चौधरी यांनी मानले तर सूत्रसंचालन सत्यानंद गावित यांनी केले.



