*विश्व पर्यावरण दिनानिमित्त बीपीसीएलची हरित पुढाकार, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार येथे 100 केशर आंबा रोपांचे वृक्षारोपण*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*विश्व पर्यावरण दिनानिमित्त बीपीसीएलची हरित पुढाकार, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार येथे 100 केशर आंबा रोपांचे वृक्षारोपण*
*विश्व पर्यावरण दिनानिमित्त बीपीसीएलची हरित पुढाकार, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार येथे 100 केशर आंबा रोपांचे वृक्षारोपण*
नंदुरबार(प्रतिनिधी):-विश्व पर्यावरण दिनाच्या निमित्ताने बीपीसीएलच्या 50.40 मेगावॅट पवन ऊर्जा प्रकल्प, नंदुरबार यांच्या वतीने डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र, कोलदा, नंदुरबार येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत 100 केशर आंबा रोपांची लागवड करून पर्यावरण संवर्धन, जैवविविधता संरक्षण आणि हरित विकासाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाला डॉ. होले, सुमीत कुमार, सतीश सिदार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार येथील सर्व शास्त्रज्ञ, तांत्रिक व सहाय्यक कर्मचारी तसेच बीपीसीएलचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपणात सक्रिय सहभाग घेतला. यावेळी वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख राजेंद्र दहातोंडे यांनी बीपीसीएलच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक करताना पर्यावरण संवर्धनासाठी शासन संस्था, उद्योग क्षेत्र आणि समाज यांचे संयुक्त प्रयत्न आवश्यक असल्याचे सांगितले. सहयोगी अधिष्ठाता डॉ. होले यांनीही अशा उपक्रमांमुळे पर्यावरणाबाबत जनजागृती वाढण्यास मदत होत असल्याचे नमूद केले. कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार यांनी बीपीसीएलच्या या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत करून भविष्यातही पर्यावरण संरक्षण व शाश्वत विकासासाठी अशा कार्यक्रमांना संपूर्ण सहकार्य देण्याची ग्वाही दिली. “आज लावलेले प्रत्येक झाड हे उद्याच्या हरित, समृद्ध आणि शाश्वत भविष्याचे बीज आहे.” या संदेशासह साजरा करण्यात आलेला हा उपक्रम बीपीसीएलच्या पर्यावरण संरक्षण, शाश्वत विकास आणि सामाजिक बांधिलकीप्रती असलेल्या दृढ वचनबद्धतेचे प्रतीक ठरला.



