ताजा खबरे:
*स्वामी भक्तीचा अपूर्व सोहळा, गोरेगावात ‘संकल्प 2026-27' अंतर्गत नामजप वही वितरण*
*विरार शहर प्रभाग क्र 6 मधील संरक्षक भिंत बांधून मनसेने दिलेला शब्द पाळला*
*​प्रकाशा येथे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून (CEO) कामांची पाहणी, निष्काळजी अधिकाऱ्यांची कानउघडणी*
*नंदूरबार नगरपालीकेच्या सर्वसाधारण सभेत कत्तलखाना दुरुस्तीच्या नावाखाली कत्तलखाना पुन्हा सुरु करण्याचा ठराव पारित केल्याबाबत् तहसीलदार यांना निवेदन*
*नंदुरबार प्रवासी महासंघ, ग्राहक पंचायततर्फे लालपरीचा सन्मान*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*स्वामी भक्तीचा अपूर्व सोहळा, गोरेगावात ‘संकल्प 2026-27' अंतर्गत नामजप वही वितरण*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*स्वामी भक्तीचा अपूर्व सोहळा, गोरेगावात ‘संकल्प 2026-27' अंतर्गत नामजप वही वितरण*

  • Share:

*स्वामी भक्तीचा अपूर्व सोहळा, गोरेगावात ‘संकल्प 2026-27' अंतर्गत नामजप वही वितरण*                           मुंबई(प्रतिनिधी):-श्री स्वामी समर्थ मठ (हडपीड देवगड), श्री स्वामी समर्थ मठ (छोटा काश्मीर गोरेगाव) आणि कोकण कट्टा (विलेपार्ले) यांच्या संयुक्त विद्यमाने गोरेगाव येथे अक्कलकोट भूषण स्वामी रत्न पुरस्कार सन्मानित श्री.नंदकुमार पेडणेकर, अजित पितळे, अशोक गुराम यांच्या पुढाकाराने व अनिल देसाई यांच्या आयोजनात धार्मिक उत्साहात  नुतन विद्यामंदिर संचालित महाराष्ट्र कलामंदिर सभागृहात सोहळा पार पडला. ‘संकल्प 2026-27’ अंतर्गत 11 कोटी 11 लाख 11 हजार 111 लिखित नामजप पूर्ण करण्याचा जो विडा आपण उचलला आहे, तो केवळ एक आकडा नाही; तर ती आपल्या सर्वांची स्वामींवर असलेली अथांग श्रद्धा आहे. आपण श्री स्वामी भक्ता नी रोज आवर्जून वेळ काढा, नामजप लिहा. प्रत्येक अक्षरासोबत आपले मन स्वामी चरणी लीन होऊ द्या. जेव्हा आपण एकत्र येऊन हा संकल्प पूर्ण करू तेव्हा त्याची ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या घरात सुख, समृद्धी आणि शांतता घेऊन येईल यात शंका नाही. हा एवढा मोठा आणि कौतुकास्पद उपक्रम राबवल्याबद्दल स्वामींभक्त नंदकुमार पेडणेकर, दोन्ही मठ आणि 'कोकण कट्टा' यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले आहेत. आपण सर्वांनी अशीच स्वामी सेवा करत राहावी असे आवाहन श्री स्वामी समर्थ मठ चेंबूरचे मठाधीश स्वामी भक्त विजय नलावडे यानी यावेळी केले.                             
श्री स्वामी समर्थ मठ (हडपीड देवगड). श्री स्वामी समर्थ मठ (छोटा काश्मीर-गोरेगाव)’ आणि ‘कोकण कट्टा (विलेपार्ले)’ यांच्या संयुक्त विद्यमाने गोरेगाव येथे  ‘संकल्प 2026-27’ अंतर्गत 11 कोटी 11 लाख 11 हजार 111 लिखित नामजप संकल्प पूर्तीसाठी नामजप वही वितरण सोहळा  धार्मिक वातावरणात संपन्न झाला. यावेळी श्री स्वामी भक्ती गीतांचा कार्यक्रम सुरश्री संगीत प्रशिक्षण केंद्र गोरेगावच्या संचालिका सौ. शुभांगी देसाई, अनिल देसाई, वरुण बिडये, कु. कांचन जाधव, प्रदीप लोकरे , मिलिंद अंचेकर आणि सुप्रसिद्ध संगीत विशारद, गायक जितेंद्र मेस्त्री यांनी झाली स्वामी कृपा झाली हा कार्यक्रम सादर केला, स्वामी समर्थ आणि पादुका दर्शन कार्यक्रमास स्वामी भक्तांनी महाराष्ट्र कलामंदिर सभागृहात गर्दी केली होती. यावेळी महा प्रसादाचे आयोजन केले होते.                        
आधुनिक जगात आपले जीवन खडतर झाले आहे. प्रत्येक जण थोडी सुख शांती मीळण्यासाठी खडतर प्रवास करत आहे. अशा या जीवनात थोडे सूख मीळण्यासाठी आपल्या दैवताचा ' श्री स्वामी समर्थ' हा नामजप करण्यास दिवसभरात दहा मिनिटे दिल्यास मानसिक समाधान मीळेल. मागील काही वर्षे मी आणी माझे सहकारी लिखीत नामजप वह्या मोफत लोकांपर्यंत पोहोचवत असून  आतापर्यंत 7 सात करोड लिखीत नामजप संकल्प पूर्ण करून भक्तांस एक प्रकारे आनंद मिळण्यास प्रयत्न केला. भक्तांना असाच आनंद मिळण्यासाठी 11 अकरा कोटी लिखीत नामजप संकल्प पूर्ण करण्यासाठीच तेरा हजार छापील नामजप वह्या वाटल्या गेल्या आहेत असे हडपिड स्वामी सामर्थ मठाचे संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर यावेळी म्हणाले. यावेळी मान्यवरानी मनोगत व्यक्त करताना शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री.स्वामी समर्थ मठ चेंबूरचे मठाधीश स्वामी भक्त श्री विजय नलावडे, श्री स्वामी समर्थ मठ भुईगांव वसई मठाधीश स्वामी भक्त संदिप म्हात्रे, स्थानिक          नगरसेविका सौ. लक्ष्मी भाटिया, नुतन विद्यामंदिर संस्थेचे सचिव अनिल देसाई, स्वामी समर्थ मठ हडपीड देवगडचे संस्थापक सचिव अक्कलकोट भुषण स्वामी रत्न पुरस्कार सन्मानित नंदकुमार तुकाराम पेडणेकर, कोकण कट्टा मुंबई संस्थापक अजित पीतळे, स्वामी समर्थ मठ छोटा काश्मिर मुंबई संस्थापक मठाधीश
अशोक गुराम,
नितीन म्हापसेकर, सचिन दिवाळे, दीपक राणे, मोनीष पेडणेकर, सुजित कदम, सजू चव्हाण तसेच नुतन विद्यामंदिर संस्थेचे सदस्य आणि शालेय समिती अध्यक्ष शंकर पटनाईक, संस्थेचे सल्लागार मुरलीधर मोरे, संस्थेचे सदस्य महेश करमरकर, शाळेचे मुख्याध्यापक विष्णू मसुरकर, इंग्रजी विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. पूर्वा नाईक, आदी उपस्थित होते.
श्री स्वामी नाम जप  वह्यांसाठी  संपर्क करा. क्रमांक 9511749741, 9987113384, 9323229074/ 9869078719

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*स्वामी भक्तीचा अपूर्व सोहळा, गोरेगावात ‘संकल्प 2026-27' अंतर्गत नामजप वही वितरण*
June, 05 2026
*विरार शहर प्रभाग क्र 6 मधील संरक्षक भिंत बांधून मनसेने दिलेला शब्द पाळला*
June, 04 2026
*​प्रकाशा येथे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून (CEO) कामांची पाहणी, निष्काळजी अधिकाऱ्यांची कानउघडणी*
June, 04 2026
*नंदूरबार नगरपालीकेच्या सर्वसाधारण सभेत कत्तलखाना दुरुस्तीच्या नावाखाली कत्तलखाना पुन्हा सुरु करण्याचा ठराव पारित केल्याबाबत् तहसीलदार यांना निवेदन*
June, 04 2026
*नंदुरबार प्रवासी महासंघ, ग्राहक पंचायततर्फे लालपरीचा सन्मान*
June, 04 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज