*प्रकाशा येथे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून (CEO) कामांची पाहणी, निष्काळजी अधिकाऱ्यांची कानउघडणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*प्रकाशा येथे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून (CEO) कामांची पाहणी, निष्काळजी अधिकाऱ्यांची कानउघडणी*
*प्रकाशा येथे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून (CEO) कामांची पाहणी, निष्काळजी अधिकाऱ्यांची कानउघडणी*
शहादा(प्रतिनिधी):-जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) नमन गोयल यांनी शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे अचानक भेट देऊन विविध विकासकामांची पाहणी केली. 2024 पासून मंजूर असलेल्या घरकुल योजनांची कामे दोन वर्षे उलटूनही अपूर्ण असल्याचे आणि नागरिकांना मनरेगा तसेच रोजगार हमी योजनेचा लाभ मिळत नसल्याचे यावेळी समोर आले. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गावात पायी फिरून भुताताळी, राणी काजळ मंदिर, खांडगाहाटी आणि मराठा गल्ली या परिसरातील कामांची पाहणी केली. यावेळी संतप्त स्थानिक लाभार्थ्यांनी त्यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचला. घरकुलाचे हप्ते न मिळणे आणि अधिकाऱ्यांच्या सुस्त कारभारामुळे लाभ मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली.
यानंतर घेतलेल्या आढावा बैठकीत नमन गोयल यांनी पंचायत समिती व ग्रामपंचायत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. शासनाकडून मोठा निधी उपलब्ध असूनही अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे गरजू नागरिक लाभापासून वंचित राहत असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे सक्त निर्देश दिले. या बैठकीला प्रकल्प संचालक राऊत, गट विकास अधिकारी महेश पोतदार, सहाय्यक गटविकास अधिकारी राठोड, ग्रामपंचायत अधिकारी बी. जी. पाटील व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.



