*नंदुरबार प्रवासी महासंघ, ग्राहक पंचायततर्फे लालपरीचा सन्मान*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार प्रवासी महासंघ, ग्राहक पंचायततर्फे लालपरीचा सन्मान*
*नंदुरबार प्रवासी महासंघ, ग्राहक पंचायततर्फे लालपरीचा सन्मान*
नंदुरबार(प्रतिनिधी):-सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहीनी ठरलेली राज्य परिवहन महामंडळाची एसटी अर्थात लालपरीचा एक जून रोजी वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र प्रवासी महासंघ व ग्राहक पंचायततर्फे सन्मान करण्यात आला. राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीला एक जून रोजी 77 वर्ष पूर्ण होऊन 78 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त ग्राहकतीर्थ स्व. बिंदू माधव जोशी प्रणित प्रवासी महासंघ नंदुरबार जिल्हा आणि ग्राहक पंचायत शाखेतर्फे आगारप्रमुख, स्थानक प्रमुख अधिकारी तसेच कर्तव्यावरील वाहक, चालकांचा सन्मान करण्यात आला. लालपरीच्या वर्धापन दिनानिमित्त प्रातिनिधीक स्वरूपात नंदुरबार- पुणे बस फुलमाळा आणि केळीच्या खांबांनी सजविण्यात आलेली होती. याप्रसंगी ग्राहक पंचायत प्रणित प्रवासी महासंघाचे नंदुरबार तालुका अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीचा थोडक्यात लेखाजोखा मांडला. प्रवासी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश जैन यांच्या हस्ते आगार प्रमुख संदीप निकम यांचा पदोन्नतीबद्दल सन्मान करण्यात आला. तसेच लालपरीच्या वर्धापन दिनानिमित्त महिला वाहक करुणा पाटील, ज्योत्स्ना सैंदाणे, चालक रवींद्र जगताप, उमेश गवळे आणि उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास नंदुरबार आगारातील देवेंद्र सूर्यवंशी, रवींद्र जगताप, प्राचार्य बेडसे, ऋषिकेश पावरा, कुणाल तांबोळी, प्रवासी महासंघाचे ज्येष्ठ सदस्य बी.डी. गोसावी, सुरेखा वळवी, श्रद्धा पाटील, वैभव करवंदकर, डॉ. गणेश ढोले, वासूदेव माळी, राम ठक्कर, दर्शन ठक्कर तसेच प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



