*टूकी ग्रामपंचायतीचे उपसरपंच दिलीप मुसळदे यांचे ग्रामपंचायतीतील विविध विकासकामे आणि शासकीय निधींच्या खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करत, विभागीय आयुक्त कार्यालय,
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*टूकी ग्रामपंचायतीचे उपसरपंच दिलीप मुसळदे यांचे ग्रामपंचायतीतील विविध विकासकामे आणि शासकीय निधींच्या खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करत, विभागीय आयुक्त कार्यालय,
*टूकी ग्रामपंचायतीचे उपसरपंच दिलीप मुसळदे यांचे ग्रामपंचायतीतील विविध विकासकामे आणि शासकीय निधींच्या खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करत, विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे आमरण उपोषण*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील टूकी ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. ग्रामपंचायत टूकीचे उपसरपंच दिलीप नभू मुसळदे यांनी ग्रामपंचायतीतील विविध विकासकामे आणि शासकीय निधींच्या खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करत विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.
उपसरपंच दिलीप मुसळदे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, सन 2022 पासून ग्रामपंचायत टूकी येथे पंधरावा वित्त आयोग, पेसा निधी, ग्रामनिधी, पाणीपुरवठा योजना, दलित वस्ती निधी, टक्कर बाप्पा योजना, जनसुविधा योजना तसेच इतर विविध योजनांअंतर्गत झालेल्या खर्चाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनात सरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगनमत करून अनेक कामांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच ग्रामपंचायतीतील सदस्य व उपसरपंच यांना विश्वासात न घेता निर्णय घेतले जात असल्याचेही म्हटले आहे. काही विकासकामे प्रत्यक्षात न करता निधी खर्च दाखवून लाखो रुपयांचा अपहार झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, 29 एप्रिल 2026 रोजी पंधरावा वित्त आयोगाच्या निधीतून कोणतेही काम न करता 5 लाख रुपये काढण्यात आल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणे, संबंधित अधिकारी व ग्रामसेवकांना निलंबित करणे, फौजदारी गुन्हे दाखल करणे, ग्रामपंचायत कार्यालयातील कागदपत्रांमध्ये फेरफार होऊ नये म्हणून कार्यालयाला सील करणे आणि ग्रामपंचायत बरखास्त करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, मागील अडीच वर्षांपासून पंचायत समिती शहादा आणि जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या. मात्र, अद्याप कोणतीही प्रभावी कारवाई झाली नसल्याने त्यांनी अखेर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.
3 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे हे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणातील सर्व आरोप हे उपोषणकर्त्यांनी केलेले असून त्यांची अधिकृत चौकशी होणे अद्याप बाकी आहे. संबंधित प्रशासन, सरपंच किंवा ग्रामसेवक यांची बाजू अद्याप समोर आलेली नाही.



