*नंदूरबार नगरपालीकेच्या सर्वसाधारण सभेत कत्तलखाना दुरुस्तीच्या नावाखाली कत्तलखाना पुन्हा सुरु करण्याचा ठराव पारित केल्याबाबत् तहसीलदार यांना निवेदन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदूरबार नगरपालीकेच्या सर्वसाधारण सभेत कत्तलखाना दुरुस्तीच्या नावाखाली कत्तलखाना पुन्हा सुरु करण्याचा ठराव पारित केल्याबाबत् तहसीलदार यांना निवेदन*
*नंदूरबार नगरपालीकेच्या सर्वसाधारण सभेत कत्तलखाना दुरुस्तीच्या नावाखाली कत्तलखाना पुन्हा सुरु करण्याचा ठराव पारित केल्याबाबत् तहसीलदार यांना निवेदन*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार नगरपालीकने कत्तलखाना दुरुस्तीच्या नावाखाली बंद असलेला कत्तलखाना पुन्हा सुरू करण्याचा ठराव पारित केला आहे. राज्यात गौमातेला राज्यमातेचा दर्जा प्राप्त असताना व राज्यात गौवंश हत्येला बंदी असताना याठिकाणी अवैध गौवंश कत्तलीची दाट शक्यता आहे. जिल्हयात यापूर्वीही अवैध गौवंश हत्या अनेकवेळा उघडकीस आली आहे. हा कत्तलखाना पुन्हा सुरु सान्यास पर्यावरणाचा देखील मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. फक्त गौवंश नव्हे, तर इतर पशुबळी देखील पर्यावरण पुरक नाही. आधीच संवेदनशील असलेल्या या जिल्हयात कत्तलखाना सुरु झाल्यास धार्मीक तेढ निर्माण होऊन सार्वजनीक शांततेचा भंग होऊ शकतो. या जिल्हयात विवीध दृष्य्या हा विषय हानिकारकच आहे. तरी, याप्रकरणी त्वरीत हस्तक्षेप करून हा ठराव रद्द करावा. अन्यथा येत्या काळात विश्व हिंदू परिषदेकडून मोठे आंदोलन उभे केले जाईल व याला सर्वस्वी जवाबदार नंदुरबार नगरपालीका असेल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.