*विरार शहर प्रभाग क्र 6 मधील संरक्षक भिंत बांधून मनसेने दिलेला शब्द पाळला*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*विरार शहर प्रभाग क्र 6 मधील संरक्षक भिंत बांधून मनसेने दिलेला शब्द पाळला*
*विरार शहर प्रभाग क्र 6 मधील संरक्षक भिंत बांधून मनसेने दिलेला शब्द पाळला*
विरार(प्रतिनिधी):-पूर्व कडील प्रभाग क्र. 6 मधील नाल्यालगत संरक्षक भिंत नसल्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपप्रभाग अध्यक्ष उमेश झोळे यांनी ही गंभीर बाब मनसेचे उपशहर अध्यक्ष सुशांत गुरव यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी सुशांत गुरव यांनी नागरिकांना स्पष्ट शब्दांत आश्वासन दिले होते की, "आठ दिवसांच्या आत महानगरपालिकेमार्फत ही संरक्षण भिंत बांधून दिली जाईल. जर पालिकेने काम केले नाही, तर मनसेतर्फे आम्ही स्वतःच्या खिशातून ही भिंत बांधून देऊ दुर्दैवाने महानगरपालिकेकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने, दिलेल्या शब्दाला जागत मनसेच्या वतीने स्वखर्चाने संरक्षण भिंतीच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. मनसेसाठी राजकारण म्हणजे केवळ आश्वासने नाहीत, तर दिलेला शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी आहे. नागरिकांकडून सुशांत गुरव साहेब आणि मनसेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.



