*पाचल महागणपती मंदीर येथे अधिकमासा निमित्त जमला वारकरी यांचा मेळा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पाचल महागणपती मंदीर येथे अधिकमासा निमित्त जमला वारकरी यांचा मेळा*
*पाचल महागणपती मंदीर येथे अधिकमासा निमित्त जमला वारकरी यांचा मेळा*
पाचल(प्रतिनिधी):-राजापूर तालुक्यातिल पाचल महागणपती मंदीर या ठिकानी अधिकमासानिमित्त राजापूर तालुका अखंड वारकरी सांप्रदाय, पाचल पूर्व विभाग यांच्या वतीने श्री महागणपती मंदिर, पाचल येथे भव्य हरिनाम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी श्री विष्णू सहस्त्रनाम पठण करून शांततेचा प्रसार केला गेला. त्या नंतर आध्यात्मिक आणि धार्मिक या वातावरणात होणाऱ्या या भक्तिमय सोहळ्यास पंचक्रोशीतील वारकरी, भाविक आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवत सामूदायिक हरिपाठाला ह.भ.प.दौलत महाराज यांनी सुरुवात.त्यांना साथ दिली ती अजित महाराज बारगोडे आणि संतोष महाराज चव्हाण यांनी सामूदायिक हरिपाठ झाल्या नंतर किर्तनाला सुरुवात केली गेली.
किर्तन सेवा ही सुद्धा दौलत महाराज पाटेकर यांच्या कडेच सोपवण्यात आली होती. पुण्यकाळात आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाची सुरुवात सायंकाळी 4 वाजता सामूहिक गीतावाचन व विष्णू सहस्रनाम पठणाने सुरुवात करून. त्यानंतर सायंकाळी 5.30 ते 7 या वेळेत सामुदायिक हरिपाठाचे आयोजन करण्यात आले. रात्री 7.30 ते 9.30 या वेळेत ह.भ.प. दौलत महाराज पाटेकर यांचे कीर्तन झाले. अशी ह्या कार्यक्रमाची रूपरेषा आखली गेली होती. दौलत महाराज पाटेकर यांच्या किर्तनाचा लाभ अखंड पाचल पंचक्रोशी वारकरी व जनतेने घेतला. त्यांच्या रसाळ बोल वाणीने जनता फार आनंदी मय होवून गेल्याचा जागीच दाखला मिळाला. आणि त्यामध्ये गायनाचार्य अजित महाराज बारगोडे आणि संतोष महाराज चव्हाण यांनी त्यांना चांगलीच साथ दिली. कीर्तनाची सेवा पूर्ण झाली त्या नंतर महाप्रसाद झाला. या महोत्सवासाठी वै. ह.भ.प. सोनुबाबा कुर्णे कर पायी दिंडी संस्था, ता. लांजा यांचे विशेष सहकार्य लाभले गेले. व पाचल परिसरातिल जनतेने सुद्धा मोठ्या प्रमानात सहकार्य केले. नामस्मरण, भक्ती आणि समाज प्रबोधनाचा संदेश देणाऱ्या या हरिनाम महोत्सवातून आध्यात्मिक वातावरण निर्माण केले गेले. अधिकाधिक भाविकांनी या भक्तिमय एक दिवसाच्या सोहळ्याचा लाभ घेतला. राजापूर तालुका अखंड वारकरी सांप्रदाय, पाचल तसेच श्री महागणपती उत्सव मंडळ, पाचल यांच्या वतीने हा कार्यक्रम पार पाडण्यात आला.
त्या प्रसंगी राजापूर तालुका अखंड वारकरी सांप्रदाय यांचे सर्वश्ची गायनाचार्य व मृदुंग मणी, वादक टाळकरी, वारकरी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली गेली.



