*पाचल-जवळेथर रस्त्या दरम्यान ताम्हाणे फाटा ते तळवडे आंबेवाडी रस्त्याचे काम रखडले, नागरिकांचा आंदोलनाचा इशारा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पाचल-जवळेथर रस्त्या दरम्यान ताम्हाणे फाटा ते तळवडे आंबेवाडी रस्त्याचे काम रखडले, नागरिकांचा आंदोलनाचा इशारा*
*पाचल-जवळेथर रस्त्या दरम्यान ताम्हाणे फाटा ते तळवडे आंबेवाडी रस्त्याचे काम रखडले, नागरिकांचा आंदोलनाचा इशारा*
पाचल(प्रतिनिधी):-सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ व अनागोंदी कारभारामुळे पाचल-जवळेथर रस्त्यातंर्गत ताम्हाणे फाटा ते तळवडे आंबेवाडी या 1600 मीटर लांबीच्या रस्त्याचे काम मागील चार महिन्यापासून रखडले आहे. यामुळे वाहनचालक व नागरिकांमधून कमालीचा संताप व नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. येत्या चार दिवसांत डांबरीकरणाचा दुसरा थर (कार्पेट) टाकण्यात आला नाही तर परिसरातील संतप्त वाहनचालक व नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. बांधकाम विभागासी सातत्याने संपर्क साधूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना देखील बांधकाम विभागालान अद्याप जाग आलेली नाही. हे काम वेळेत न झाल्यास याअगोदर झालेले डांबरीकरण उघडले जाऊन रस्ता वाहतूकीला धोकादायक बनणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्यावरील वाहतूक बंद होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सुमारे 20 ते 25 गावांना जोडणाऱा हा रस्ता असलेल्याने या रस्त्यावर एसटी तसेच खाजगी वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. आताच या रस्त्यावर लहान मोठे अपघात होत असून पावसाळ्यात हि परिस्थिती अधिक भयानक होणार आहे. भविष्यात या ठिकाणी एखादी मोठी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल जनते मधून विचारला जात आहे. या सर्व बाबींचा विचार करून येत्या चार दिवसात या रस्त्याचे अपूर्ण राहिलेले डांबरीकरण तातडीने पूर्ण करावे. अन्यथा बांधकाम विभागाच्या या भोंगळ कारभाराविरोधत कोणतीही पूर्वसूचना न देता तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील वाहनचालक तसेच नागरिकांनी दिला आहे.



