*डी.आर. हायस्कूलमध्ये दहावीतील गुणवंतांचा गुणगौरव सोहळा संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*डी.आर. हायस्कूलमध्ये दहावीतील गुणवंतांचा गुणगौरव सोहळा संपन्न*
*डी.आर. हायस्कूलमध्ये दहावीतील गुणवंतांचा गुणगौरव सोहळा संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूलमध्ये दहावीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. दहावी परीक्षेचा निकाल नुकताच लागला आहे. या परीक्षेत डी.आर. हायस्कूलचा 97.89 टक्के निकाल लागलेला आहे. गुणवंत विद्यार्थ्या मध्ये
प्रथम क्रमांक: वेदांत पाटील (94.60 टक्के)
द्वितीय क्रमांक: रोशन पाटील(94 टक्के)
तृतीय क्रमांक: जन्मेंजय पगारे (92.60 टक्के)
चतुर्थ क्रमांक: जयदीप धनगर (92.40 टक्के)
पाचवा क्रमांक: दुर्गेश पाटील (91 टक्के) यशस्वी विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा संस्थेचे चेअरमन नरेंद्रभाई सराफ, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, सचिव प्रशांत पाठक, कार्यकारिणी सदस्य पंकज पाठक, मुख्याध्यापक संजय सैंदाणे, उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक, पर्यवेक्षक हेमंत खैरनार यांच्या शुभ सत्कार व गुणगौरव करण्यात आला.
यशस्वी विद्यार्थ्यांपैकी वेदांत पाटील व जन्मेंजय पगारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र लांडगे यांनी केले तर आभार दिनेश वाडेकर यांनी मानले.



