*वाण्याविहिरी येथे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांच्या मुलावर राजकीय वैमनष्यातून हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला करून जखमी केल्याची घटना*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*वाण्याविहिरी येथे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांच्या मुलावर राजकीय वैमनष्यातून हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला करून जखमी केल्याची घटना*
*वाण्याविहिरी येथे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांच्या मुलावर राजकीय वैमनष्यातून हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला करून जखमी केल्याची घटना*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहिरी येथे भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांच्या मुलावर राजकीय वैमनष्यातून हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला करून जखमी केल्याची घटना दिनांक 29 मे 2026 रोजी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत हल्लेखोरान विरोधात अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर गावाच्या फाट्यावर 29 मे 2026 रोजी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास आरोपी सागर रजेसिंग पाडवी, मित जितेंद्र पाडवी, सुमित कांतीलाल पाडवी, रवींद्र टेडग्या नाईक, रहेश रमेश तडवी, अजय मनोज पाडवी सर्व राहणार वाण्याविहीर विशाल विक्रमसिंग पाडवी, अश्विक राकेश पाडवी राहणार नाला यांच्यासह आठ ते दहा अज्ञातांनी सार्वजनिक ठिकाणी गैर कायद्याची मंडळी जमवून वैभव नागेशकुमार पाडवी यास हाता बुक्क्यांनी मारहाण करून त्याची महिंद्रा थार गाडी क्रमांक जी जे 16 एफ. ए.- 4100 चे काच फोडून नुकसान करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला तसेच जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यासह विविध कलमान्वये पोलीस नाईक सुनील तुकाराम पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस अधीक्षक अश्विनी सानप अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये पोलीस निरीक्षक सारंग नवलकर यांच्या मार्गदर्शनाने पोलीस हवालदार अतुल गावित करीत आहेत. या घटनेमुळे गावात तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून दहशतीचे वातावरण पसरल्याने ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली आहे गावात अधिक पोलिस बंदोबस्त तैनात करण्याची मागणी केली जात आहे.



