*शहीद शिरीषकुमार मंडळातर्फे बालवीर चौकात अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शहीद शिरीषकुमार मंडळातर्फे बालवीर चौकात अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
*शहीद शिरीषकुमार मंडळातर्फे बालवीर चौकात अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे प्रतिमा पूजनाने अभिवादन करण्यात आले.
बालवीर चौकात आयोजित अभिवादन कार्यक्रमा प्रसंगी धुळे येथील निवृत्त वन क्षेत्रपाल विठ्ठल नागापुरे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या न्याय धर्म आणि जनकल्याण याचा आदर्श निर्माण करणाऱ्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक कार्याला उजाळा दिला. अभिवादन कार्यक्रमास दयानंद सिदलिंग, धनराज सिदलिंग, सतीश सिदलिंग, मनोज गवळी, संतोष गवळी, गोरख नागापुरे, गोटीराम घटी, निवृत्त शिक्षक जी. एस. गवळी, संभाजी हिरणवाळे, सुदाम हिरणवाळे, यांच्यासह महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.



