*अतिदुर्गम भागातील मंजूर दहा साकव पैकी वनविभागाच्या ना हरकत दाखल्याअभावी, एकच साकव, सातपुड्यात जीव धोक्यात घालून शाळेत जाणारी बालके, रुग्ण तसेच नागरिक नदी नाले ओलांडतानाचे चित्र यावर्षीह
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अतिदुर्गम भागातील मंजूर दहा साकव पैकी वनविभागाच्या ना हरकत दाखल्याअभावी, एकच साकव, सातपुड्यात जीव धोक्यात घालून शाळेत जाणारी बालके, रुग्ण तसेच नागरिक नदी नाले ओलांडतानाचे चित्र यावर्षीह
*अतिदुर्गम भागातील मंजूर दहा साकव पैकी वनविभागाच्या ना हरकत दाखल्याअभावी, एकच साकव, सातपुड्यात जीव धोक्यात घालून शाळेत जाणारी बालके, रुग्ण तसेच नागरिक नदी नाले ओलांडतानाचे चित्र यावर्षीही दिसणार*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील मंजूर दहा साकव पैकी वनविभागाच्या ना हरकत दाखल्याअभावी केवळ एकच साकव पावसाळ्यापूर्वी पूर्णत्वास येत असल्याने, गेल्या वर्षी सातपुड्यात जीव धोक्यात घालून शाळेत जाणारी बालके, रुग्ण तसेच नागरिक नदी नाले ओलांडतानाचे चित्र यावर्षीही दिसणार असल्याचे संकेत स्पष्ट झाले आहेत,
जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी यंदाच्या पावसाळ्यात सातपुड्यात असे चित्र पुन्हा दिसू नये यासाठी जातीने लक्ष घालून पाठपुरावा सुरू ठेवला असताना मंजूर साकव केवळ वनविभागाच्या ना हरकत दाखल्याअभावी रेंगाळल्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने स्पष्ट केले आहे,
अक्कलकुवा तालुक्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात विखुरलेल्या गाव पाड्यांमध्ये पावसाळ्यात नदी नाले ओलांडण्यासाठी सुविधा नसल्याने झाडाच्या फांद्यांचा आधार घेऊन, तसेच काही ठिकाणी देशी जुगाड करून वर्षानुवर्षे जीव धोक्यात घालून नदी नाले ओलांडत असल्याचे चित्र गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात प्रखरतेने समोर आले होते, अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी येथील लहान लहान विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत जाण्यासाठी जीव धोक्यात घालून, झाडाच्या फांदीच्या आधारे धोक्याच्या पातळीने वाहणारी नदी ओलांडल्याचे चित्र मोठा चर्चेचा विषय ठरला होता, याबाबत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची गंभीर दखल घेत, तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते, असे चित्र सातपुड्यात कुठेही दिसू नये याबाबत ही गांभीर्याने लक्ष घालण्याचे निर्देश, जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांना दिले होते केलखाडी येथे तात्काळ साकव मंजूर करून भर पावसाळ्यात काम सुरू करून ते महिन्याभरात पूर्ण करण्यात येऊन, तेथील विद्यार्थ्यांची व नागरिकांना जीवघेण्या प्रवासातून मुक्ती मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले होते, याबाबत जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी जातीने लक्ष घालून संबंधित यंत्रणांना निर्देश देऊन, पावसाळ्यातील धोकेदायक ठिकाणी साकव तयार करण्यासाठी प्रस्ताव मागवून त्यांना जिल्हा विकास व नियोजन समितीकडून आवश्यक निधी मंजूर केला, अक्कलकुवा तालुक्यात अक्कलकुवा सार्वजनिक बांधकाम उपविभागाअंतर्गत सेंगलापाणी कोलवीमाळ बर्डीपाडा, कोलवीमाळ जिल्हा परिषद शाळेजवळ साकव मंजूर करण्यात येऊन केवळ सेंगलापाणी येथील साकवाला वनविभागाचे ना हरकत दाखला मिळाले असून उर्वरित दोन साकव बांधण्यासाठी वनविभागाच्या ना हरकत दाखल्यासाठी वनक्षेत्रपाल स्तरावर प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले. मोलगी सार्वजनिक बांधकाम उपविभागाअंतर्गत दुटापाडा, पिंपळपाडा, वाजवळ, हेकटापाडा, कुंडीबार, राऊतपाडा, तोलवापाडा या सात ठिकाणी साकव मंजूर करण्यात आले असून, यांतील केवळ राऊतपाडा येथील साकव पूर्णत्वास आला आहे. कुंडीबार व वाजवळ यांना वनविभागाकडून 24 एप्रिल 2026 रोजी ना हरकत मिळाली असून, उर्वरित दुटापाडा, पिंपळपाडा येथील साकवांना अद्यापी वनविभागाच्या ना हरकत दाखल्याची प्रतीक्षा आहे, मोलगी सार्वजनिक बांधकाम उपविभागाने जानेवारी महिन्यातच वनविभागाकडे प्रस्ताव सादर करून, वेळोवेळी त्याबाबत पाठपुरावा केल्याचे शाखा अभियंता देसले यांनी सांगितले.
अक्कलकुवा तालुक्यातील अक्कलकुवा व मोलगी सार्वजनिक बांधकाम उपविभागाअंतर्गत मंजूर साकव पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली असून वनविभागाने ना हरकत दाखला दिल्यास सर्व मंजूर साकव युद्धपातळीवर तयार करण्यात येतील असे उपअभियंता एस व्ही पवार यांनी स्पष्ट केले आहे.



