*भोंदू खरात नंतर राज्यात भोंदूगिरीचे अर्धशतक भोंदूबाबा विरोधात 50 गुन्हे दाखल, महिलांच्या शोषणाचे प्रमाण अधिक,सर्वात जास्त नाशिक जिल्ह्यात 5 गुन्हे दाखल*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*भोंदू खरात नंतर राज्यात भोंदूगिरीचे अर्धशतक भोंदूबाबा विरोधात 50 गुन्हे दाखल, महिलांच्या शोषणाचे प्रमाण अधिक,सर्वात जास्त नाशिक जिल्ह्यात 5 गुन्हे दाखल*
*भोंदू खरात नंतर राज्यात भोंदूगिरीचे अर्धशतक भोंदूबाबा विरोधात 50 गुन्हे दाखल, महिलांच्या शोषणाचे प्रमाण अधिक,सर्वात जास्त नाशिक जिल्ह्यात 5 गुन्हे दाखल*
नंदुरबार(प्रतिनिधी):-राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर सव्वा दोन महिन्यात पोलिसांनी राज्यात 50 भोंदू बाबांचा दरबार उधळून लावला आहे. सर्वात जास्त नाशिक जिल्ह्यात 5 गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, बुवाबाजी संघर्ष विभागाच्या कार्यवाह एडवोकेट रंजना गवांदे व सहकार्यवाह विष्णुदास लोणारे यांनी दिली आहे. राज्यकार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी ही गुन्ह्यांची यादी संकलित केली आहे. राज्यातील 50 प्रकरणांपैकी बहुतांश प्रकरणात महिलांचे लैंगिक शोषण झाल्याचे समोर आले आहे. पुरोगामी महाराष्ट्रात भोंदूंचे पेव किती फुटले आहे, याची राज्यभर चर्चा चालू आहे. नाशिक येथे घडलेल्या भोंदू अशोक खरातच्या प्रकरणानंतर दोन महिन्यात राज्यात एकून 50 गुन्हे दाखल झाले आहे. पुरोगामी महाराष्ट्राला चिंतेत टाकणारी व विचार करायला लावणारी ही घटना आहे. काही ठिकाणी उत्स्फूर्त तर काही ठिकाणी अंनिसच्या प्रयत्नाने हे गुन्हे दाखल झाले आहे. या यादीवरून असे लक्षात येते की बहुतांश सर्वच धर्मातील भोंदू बाबा विरोधात गुन्हे दाखल झाले आहे. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम केवळ हिंदू धर्मातच केले जाते, या सनातनी आरोपाला पुन्हा एकदा सणसणीत उत्तर मिळाले आहे.
भोंदू बाबांनी ग्रामीण भागासह व शहरी भागातील महिला व पुरुष यांची फसवणूक केल्याचे या घटनांवरून उघड झाले आहे. विशेषता यात महिलांवरील शाररिक शोषणासह आर्थिक लुटीचे प्रमाण अधिक आहे. भितीपोटी व सामाजिक प्रतिष्टेपोटी अनेक पीडित समोर येण्यास घाबरत आहे. खरात प्रकरणानंतर पीडित महिलांना लढण्याची हिंमत निर्माण झाली आहे. त्यांना न्यायाची अपेक्षा पण निर्माण झाली आहे. इतरही आणखी पीडितांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.
अंधश्रद्धेमुळे समाजातील फसवणूक रोखण्यासाठी शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने 18 वर्ष लढा दिला. या संघर्षा नंतर 2013 मध्ये ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा व त्याचे समूळ उच्चाटन अधिनियम 2013’ हा कायदा अस्तित्वात आला. असा कायदा बनविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले होते.या कायद्याची प्रभावी अंबलबजवणी करण्यात सरकार अयशस्वी ठरले असले तरी अंनिस मर्यादा व क्षमता याचा विचार करता, आपल्या पातळीवर त्याचे प्रबोधन, प्रचार, प्रसार करत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गुन्हे दाखल होत आहे. हे गुन्हे जादूटोणा विरोधी कायदा किंवा इतर कायद्याच्या कलमाखाली दाखल झालेले आहे. ह्या 50 दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपशील अशोक कुमार खरात नाशिक, गडगेबाबा राजेंद्र गडगे संगमनेर अहिल्यानगर, चेतन सुनील माळी मूर्तिजापूर अकोला, पंकज देवराम घोलप येडगांव पुणे,
मोहन मामा भोसले कुर्डुवाडी सोलापूर, नाना बर्डे आळे फाटा पुणे,
ऋषिकेश वैद्य वसई मुंबई, अल्ताफ रईस खान मालाड मुंबई,
रिधम पांचाळ मालाड मुंबई, गणेश शिंदे श्रीरामपुर अहिल्यानगर, अर्जुन चव्हाण उर्फ टनटन बाबा नवी मुंबई, विठोबा वाल्मीक जाट सातपूर नाशिक,
किसन तळपे मंदोशी खेड, महेशगिरी उर्फ महेश काकडे लासलगाव नाशिक, अब्दुल रशीद शेख खालापूर रायगड,
इरफान नियाज अहमद कांदिवली मुंबई, अनिल सोलोमन सिंग
(पादरी) पुणे, शिवराम पराश सावर पालघर,
अल्ताफ हसन मदारी जळगाव,
नाना महाराज उर्फ गुरु माऊली वीरकर टेंभुर्णी सोलापूर, पिंटू धुमाळ बारामती पुणे,
हेमदास किसन बावणेअड्याळ भंडारा, चंद्रकांत राजेंद्र माळी इगतपुरी नाशिक,
अशोक मधुकर आढाव श्रीरामपूर अहिल्यानगर,
औदुंबर गडदे स्वारगेट पुणे, नवनाथ गवळी खेड पुणे, शाहिद शेख, खडकपाडा कल्याण, शिवभाऊ सोनवणे सर्जेपुरा अहिल्यानगर, ज्ञानेश्वर नागोराव कोरडे बिलोली नांदेड, रमेश गुप्ता मालाड मुंबई, हरिगिरी दत्तगिरी महाराज भाग्यनगर नांदेड, मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित ठाणे, कृष्णा उर्फ भगत सुभाष चित्ते
पश्चिम देवपूर धुळे,
यशवंत एकनाथ थोरात पारनेर अहिल्यानगर,
श्याम महाराज राठोड दिघी पुणे, सुधाकर गाडगे बाळापूर अकोला,
परमेश्वर उर्फ प्रमोद बाळू गायकवाड उत्तमनगर पुणे,
शितल सालके व पोर्णिमा सारस्वत भारती विद्यापीठ पुणे, योगेश उर्फ भैय्या बापू खैरनार
निजामपूर साक्री धुळे, विठ्ठल पवार महागाव यवतमाळ,
ताहीर रशीद बेग सक्करदरा नागपूर,
सुधाकर रमेश काळे अंजनगाव सुर्जी अमरावती, अशोक रामधन राठोड वडगाव (जंगल) यवतमाळ, महेश मोहन बाबर विटा सांगली, कमलेश महाराज अधिकारी इंदिरानगर नाशिक,
परवेज अब्दुल अजीज मेमन कोंढवा पुणे,
गंगाधर बुरांडे सावली चंद्रपूर,
भीमराव पुंजाराम बिहाडे संभाजीनगर,
मुक्तानंदगिरी महाराज उर्फ बापू महाराज कन्नड संभाजीनगर, राजू बन्सी दिवटे पारनेर, अहिल्यानगर.
संकलन कृष्णा चांदगुडे, महा. अंनिस, मो - 9822630378.



