*नंदुरबार येथे 30 व 31 मे रोजी दिव्यांग बांधवांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी, मोफत सहाय्यभूत साहित्य वाटप तालुकास्तरीय शिबिराचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथे 30 व 31 मे रोजी दिव्यांग बांधवांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी, मोफत सहाय्यभूत साहित्य वाटप तालुकास्तरीय शिबिराचे आयोजन*
*नंदुरबार येथे 30 व 31 मे रोजी दिव्यांग बांधवांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी, मोफत सहाय्यभूत साहित्य वाटप तालुकास्तरीय शिबिराचे आयोजन*
नंदूरबार(प्रतिनिधी):-जिल्हा समाज कल्याण विभाग व जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच श्री भगवान महावीर विकलांग सहायता समिती जयपुर फूट नवी दिल्ली यांच्यामार्फत दिव्यांग बांधवांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत सहाय्यभूत साहित्य वाटप तालुकास्तरीय शिबिराचे आयोजन 30 मे 2026 व 31 मे 2026 रोजी नंदुरबार शहरातील एस ए मिशन हायस्कूल सिंधी कॉलनी या ठिकाणी करण्यात आले असून, या शिबिरात सकाळी 11 ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत नंदुरबार तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत सहाय्यभूत साहित्य वाटप करण्यात येणार आहे, यात तालुक्यातील दिव्यांग बांधव तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी कृत्रिम अवयव, हात पाय कॅलिपर्स, स्पायनल ऑर्थोसिस, कॅलिपर्स, मॉर्निंग शूज, वॉकर, व्हीलचेअर, कॉकिंग स्टिक, फोल्डिंग काठी, चार पायांची काठी, हाय बॅक चेअर, कमोड चेअर, एअर होम गादी, बेड रोलिंग, अँटी स्लिपमेंट बाथ चेअर यांचे वाटप करण्यात येणार आहे, या शिबिराचा तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी तसेच ज्येष्ठ नागरिकांनि मोफत तपासणी करून लाभ घ्यावा असे आवाहन दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत करण्यात आले आहे.