*कोकणी हिल परिसरात संत भीमा भोई जयंती उत्साहात साजरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कोकणी हिल परिसरात संत भीमा भोई जयंती उत्साहात साजरी*
*कोकणी हिल परिसरात संत भीमा भोई जयंती उत्साहात साजरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार शहरातील कोकणी हिल परिसरात 25 मे 2026 रोजी कवीश्रेष्ठ भगवान श्री संत भिमा भोई यांच्या जयंतीनिमित्त उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, कार्यक्रमाची सुरुवात संत भीमा भोई यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी संत भीमा भोई यांच्या कार्याचा, विचारांचा व समाज प्रबोधनातील योगदानाचा गौरवपूर्ण आढावा घेतला. या कार्यक्रमात इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळाले. तसेच कार्यक्रमात महिलांचा विशेष सहभाग होता आणि त्यांच्या मेहनतीमुळे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला, कार्यक्रमास परिसरातील नागरिक, पालक, विद्यार्थी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडला. सामाजिक ऐक्य, शैक्षणिक प्रोत्साहन आणि संत विचारांचा जागर यांचा सुंदर संगम या कार्यक्रमातून पाहायला मिळाला.



