*बागवेवाडीतील ग्रामस्थांचा शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बागवेवाडीतील ग्रामस्थांचा शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश*
*बागवेवाडीतील ग्रामस्थांचा शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील मौजे बागवेवाडी येथील ग्रामस्थांनी आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वावर व कार्यप्रणालीवर विश्वास व्यक्त करत शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी बोलताना किरण सामंत यांनी सांगितले की, बागवेवाडी ग्रामस्थांनी दाखवलेला विश्वास कायम राखत गावातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्यात येतील. सर्वसामान्यांच्या विकासासाठी मी कायम कटिबद्ध आहे. आमदार झाल्यापासून राजापूर तालुक्यात विकासकामांना चांगली गती मिळाल्याचे ग्रामस्थांनी यावेळी नमूद केले. गावचे ग्रामस्थ तसेच बालमित्र मंडळाचे माजी अध्यक्ष कमलेश गांगण यांनी मागील दोन ते तीन वर्षांत गावात झालेल्या विविध विकासकामांचा आढावा मांडला . विशेषतः मुख्य रस्त्याचे डांबरीकरण व बीएसएनएल टॉवर उभारणी यामुळे ग्रामस्थांना मोठा फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आमदारांच्या माध्यमातून भविष्यात नियोजित असलेल्या विकासकामांचीही माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे ग्रामविकास अधिकारी मंगेश पांचाळ यांनी बागवेवाडी व पंचक्रोशीतील गावांसाठी महत्त्वाचे असलेल्या सौंदळ रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण करण्याची मागणी मांडली. कार्यक्रमाला शिवसेना नेते रवींद्र नागरेकर, जिल्हा परिषद सदस्य प्रतीक मटकर, पंचायत समिती सदस्य उमेश पराडकर, मुन्ना खामकर, योगेश वाघधरे, आत्माराम सुतार, शैलेश साळवी, संदीप बारस्कर, प्रल्हाद नारकर, बाबालाल फरास, आप्पा साळवी, सुनील गुरव, प्रसाद गुरव, गौरव सौरप आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच गावातील सरपंच नीलम हातणकर, मुंबई मंडळाचे अध्यक्ष संतोष शेट्ये, संतोष कामतेकर,योगेश हातणकर , धोंडू पांचाळ, राजेंद्र पांचाळ, चंद्रकांत गांगण, बुवा बावकर, वासुदेव चौगुले, केशव कामतेकर, रवींद्र पांचाळ, प्रमोद आगटे, मकरंद गांगण, मनोज पांचाळ, महेश पांचाळ, मोतीराम कामतेकर, नारायण बावकर, सुरेश पांचाळ, प्रकाश पांचाळ, ज्ञानदेव कोरगांवकर, स्वप्निल शिरसाट, रामचंद्र पांचाळ, अशोक शेट्ये, सुहास पांचाळ, संदीप पांचाळ, मनोहर पांचाळ आदी ग्रामस्थ, पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पक्षप्रवेशानंतर संपूर्ण परिसर भगवामय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुंबई मंडळ अध्यक्ष संतोष शेट्ये, सचिव विजय पांचाळ, उपसरपंच शिवराम कामतेकर, मंगेश पांचाळ, कमलेश गांगण, योगेश हातणकर, रविंद्र पांचाळ, मकरंद गांगण, प्रमोद आगटे, अनिल चौगुले, संतोष पांचाळ आदी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश गांगण यांनी केले.



