*कै.ज्ञा. म. नारकर वाचनालय पाचलतर्फे शुभ्रा सुतार हिचा सत्कार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कै.ज्ञा. म. नारकर वाचनालय पाचलतर्फे शुभ्रा सुतार हिचा सत्कार*
*कै.ज्ञा. म. नारकर वाचनालय पाचलतर्फे शुभ्रा सुतार हिचा सत्कार*
पाचल(प्रतिनिधी):-राजापूर तालुक्यातील पाचल गावची विद्यार्थ्यीनी शुभ्रा परशुराम सुतार हीने दहावीच्या परीक्षेत 98.40% गुण मिळवून राजापूर तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला होता. याबद्दल तिचा कै. ज्ञा.म. नारकर वाचनालय पाचल यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरवातीला कार्यवाह विनायक खानविलकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले तदनंतर अध्यक्ष किशोर ज्ञानदेव नारकर यांच्या हस्ते शुभ्रा हिचा ग्रंथभेट व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच तिच्या पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला शुभ्राचे वडील डॉ परशुराम सुतार, वाचनालयाचे उपाध्यक्ष राजन लब्दे, विश्वस्त श्रीकृष्ण सुतार, श्रीमती उल्का नारकर, खजिनदार शिरीष सक्रे, गौतम पांगरीकर, ग्रंथपाल विठोबा चव्हाण, लिपिक काव्या प्रसाद सुतार आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.



