*करक कारवली तिठा ग्रामीणआरोग्य केंद्राला, 23 वर्षे इमारत नाही?*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*करक कारवली तिठा ग्रामीणआरोग्य केंद्राला, 23 वर्षे इमारत नाही?*
*करक कारवली तिठा ग्रामीणआरोग्य केंद्राला, 23 वर्षे इमारत नाही?*
पाचल(प्रतिनिधी):-राजापूर तालुक्यातिल करक / कारवली या तिठा वरती आरोग्य केंद्र गेले 23 वर्षे भाड्याच्या घरात सुरु असलेल्या करक कारवली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होत नाही, बांधकाम अजूनही रखडलेल्या अवस्थेत आहे ही वस्तुस्थिती फारच संतापजनक आहे. गेली 23 वर्षे अशोक नारकर यांच्या राहत्या घरात नादुरुस्थवस्थेत आरोग्य केंद्र सुरु ठेवणे म्हणजे प्रशासनाची किती उदासीनता आहे हे लपून राहात नाही? एवढी वर्षे नादुरुस्त अवस्थेपर्यंत शासकीय दवाखाना चालविताना त्या आरोग्य कर्मचाऱ्यांची किती कुचंबणा होत असेल यावरून संबंधित खात्याची लोकप्रियत्ता व कार्यक्षमता किती आहे हे लोकांच्या लक्षात येते? गेल्या 25वर्षात पाच सरकारे गेली,फक्त "निधी नाही" हे कारण पुरेसं होणार नाही.कामाची फाईल पुढे सरकवण्याची इच्छाशक्ती असायला हवी! आरोग्य विभाग राज्यात 13 कोटी लोकांच्या आरोग्यासाठी जबाबदार आहे, पण समुदाय पातळीवर प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्थिती अशी असेल तर दुर्लक्ष होतंय असं वाटणं साहजिक आहे?
23 वर्षं इमारत नाही, कोरोना सारखी महामारी निघून गेली, अशी संकटे आली की,'आम्ही हँव करू त्यांव्ह करू' अशी तोंडापूरती भाषणे करणारे पुढारी "पैशास पायली" आहेत मात्र, ग्रामीण भागात रात्री अपरात्री संकट येते तेव्हा गोरगरीब जनतेला देव आठवतो? सुसंज्ज व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकाला रत्नागिरी, कोल्हापूर व त्यापुढे मुंबई शिवाय पर्याय उरत नसतो ही ग्रामीण भागातील आरोग्याची आजची दैनावस्था आहे!25..वर्षे रुग्णांना तपासायला चांगली जागा उपलब्ध होत नसेल तर कारवाई कुणावर करायची? अहवाल मागवायचे व कागदी घोडे नाचवत बसायचे एवढंच काम, म्हणतात ना,"सरकारी काम आणि पंचवीस वर्षे थांब". प्रशासनाची उदासीनता?, प्राथमिक आरोग्य केंद्र कारवली इमारतीच्या तळमजल्याचे बांधकाम अर्धवट असल्याचे दिसून येत आहे, किमान पावसाळ्यापूर्वी तळमजल्याचे बांधकाम पूर्ण होऊन त्या ठिकाणी आरोग्य केंद्र स्थलांतरित होईल अशी अपेक्षा होती. हे बांधकाम पूर्ण करण्यासाठी 70/ 80 लक्ष रुपयाची तरतूद झाली असल्याचे समजते मात्र, हे काम अर्धवट अवस्थेत ठेवल्याने या कामात प्रशासनाची उदासीनता दिसून येते असा प्रश्न ग्रामस्थाना पडला आहे? गेली तेवीस वर्ष हे आरोग्य केंद्र भाड्याच्या घरात सुरु असून जागेच्या गैरसोईमुळे पंचक्रोशीतील लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. नारकर यांच्या घरात सुरू असलेले हे आरोग्य केंद्र लवकरात लवकर नव्या इमारतीमध्ये सुरु व्हावे म्हणून स्थानिक कार्यकर्ते संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत, पुरेसा निधी उपलब्ध व्हावा म्हणून आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन हे आरोग्य केंद्र लवकरात लवकर सुरु व्हावे व इथल्या जनतेला त्याचा फायदा व्हावा याकरिता प्रयत्नशील असल्याचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नारायण पांचाळ यांनी या विषयावर सांगितले. नारकर यांनी आरोग्य केंद्रास दिलेल्या इमारतीला खूप वर्षे झाल्यामुळे सदर इमारत पूर्णपणे नादुरुस्त अवस्थेत असताना दिसत आहे. त्यामुळं प्रशासनानाने या गोष्टीचा गंभीर्याने विचार करून आरोग्य केंद्र इमारतीचे बांधकामं संबंधित ठेकेदाराकडून वेळीच पूर्ण करून घ्यावे व त्या ठिकाणी आरोग्य केंद्राचे स्थलांतर करून आरोग्य सेवा सुविधाचा लोकांना लाभ द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नारायण पांचाळ यांनी केली आहे.



