*सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्यास न्यायालयाने ठोठावला 4 वर्ष सश्रम कारावास व 6 हजारांचा दंड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्यास न्यायालयाने ठोठावला 4 वर्ष सश्रम कारावास व 6 हजारांचा दंड*
*सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्यास न्यायालयाने ठोठावला 4 वर्ष सश्रम कारावास व 6 हजारांचा दंड*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नवापुर पोलीस ठाण्याचे हद्दीतील फिर्यादि कन्हैय्या अजित कोकणी, वय-28 वर्ष, व्यवसाय- रेल्वे गेटमन, रा.शेही, ता.नवापुर जि. नंदुरबार हे दि.02 जून2021 रोजी दुपारी 4 वा. नवापुर हायवेरोड वरील नवरंग रेल्वे गेट नं. 69 वर डयुटीवर असतांना दुपारचे सुमारास दोन्ही बाजूने रेल्वे येणार असल्याने दोन्ही गेट बंद केले होते. गेट उघडल्यानंतर एका सिमेंट मिक्सरचे मोठे वाहनावरील चालकाने सदर वाहन चुकीच्या दिशेने पुढे नेत रेल्वे पटरीवर मध्यभागी उभे केले होते व समोरुन व मागून येणाऱ्या वाहन चालकांसोबत सिमेंट मिक्सर वाहनचालक व क्लिनर हे खाली उतरुन भांडण करीत होते. त्यामुळे ट्राफीक जाम झाल्याने फिर्यादी कन्हैय्या कोकणी यांनी सदर वाहनचालकास वाहन पुढे नेण्याबाबत विनंती केली होती. परंतु संबंधीत वाहनचालक ऐकण्याच्या परिस्थितीत नसल्याने फिर्यादी यांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी सिमेंट मिक्सर वाहनाचा क्रमांक लिहुन घेणेबाबत फिर्यादीस कळविले होते. त्यामुळे फिर्यादी कन्हैय्या यांनी सिमेंट मिक्सर वाहनाचा क्रमांक त्यांनी त्यांच्या मोबाईल मध्ये नोंद केला असता सदर गोष्टीचा राग आल्याने सिमेंट मिक्सर वाहन चालक याने फिर्यादीस धमकावत "तू माझ्या गाडीचा नंबर का घेतला तुला पाहतो." असे बोलून तो वाहन घेवून नवापूरच्या दिशेने निघुन गेला होता.
त्यानंतर सिमेंट मिक्सर वाहन चालक याने थोडया वेळात फिर्यादी असलेल्या गेट कॅबिनमध्ये इतर 3 इसमांसोबत प्रवेश करत फिर्यादी कन्हैय्या यास "गाडीचा क्रमांक का घेतला" म्हणून सर्वांनी लाकडी काठी, लोखंडी रॉडने बेदम मारहाण करीत जिवेठार मारण्याची धमकी देत तेथून पसार झाले होते. सदर घटना फिर्यादी कन्हैय्या यांनी वरीष्ठांना कळवून घटनेची तक्रार नवापुर पोलीस ठाणेत दिली होती. त्याअन्वये आरोपी जितेश सायतराव वसावे, वय-32 वर्ष, रा. पाटील फळी रायंगन ता. नवापुर जि. नंदुरबार, व इतर 3 अशांविरुध्द नवापुर पोलीस ठाणे येथे फिर्यादी कन्हैय्या अजित कोकणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गु.र.नं. 412/ 2021, भा.द.वि. कलम 353, 333, 504, 506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास नवापुर, पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक नासिरखान पठाण यांनी अत्यंत शास्त्रोक्त पध्द्तीने करत महत्वाचे पुरावे जमा केले होते व आरोपी जितेश सायतराव वसावे सह इतर 3 आरोपींविरुध्द् मुदतीत दोषारोपपत्र अति. सत्र न्यायालय, नंदुरबार येथे सादर केले होते. सदर खटल्याची सुनावणी अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश, नंदुरबार यांच्या समक्ष झाली. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने साक्षीदार तपासण्यात आले. त्यात साक्षीदार, पंच व तपास अधिकारी यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या आहेत. यावरुन सबळ पुराव्याच्या आधारे आरोपी जितेश सायतराव वसावे वय-32 वर्ष रा. पाटीलफळी, रायंगन ता. नवापुर जि. नंदुरबार याच्याविरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने त्यास अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश, नंदुरबार यांनी भा.द.वि.क. 353, 332 अन्वये दोषी ठरवत भा.द.वि.क. 353, अन्वये 4 वर्ष सश्रम कारावास व रुपये 5,000 दंड तसेच भा.द.वि.क. 332 अन्वये 1 वर्ष सश्रम कारावास व रुपये 1,000 दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
सदर खटल्याचे कामकाज सरकारी पक्षाचे वतीने अति. सरकारी अभियोक्ता अॅड. व्ही. सी. चव्हाण यांनी पाहिले असून मुख्य पैरवी अधिकारी म्हणून पोउपनि हेमंत मोहिते, पैरवी अंमलदार पो.हे.कॉ. नितीन साबळे, पो.हे.कॉ. शैलेंद्र प्रकाश जाधव, पो.कॉ. देवेंद्र पाडवी यांनी कामकाज पाहीले आहे. तपास अधिकारी तसेच सरकारी अभियोक्ता यांच्या नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, जिल्हा सरकारी वकील विनोद गोसावी यांनी अभिनंदन केले आहे.



