*सोन्याची चैन हिसकावून चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला बेड्या, 5 लाखांच्या मुद्देमालासह नंदुरबार जिल्ह्यातील 5 गुन्ह्यांसह महाराष्ट्रातील 13 असे एकूण 18 गुन्हे उघड, स्थानिक गुन्हे शाखेची क
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सोन्याची चैन हिसकावून चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला बेड्या, 5 लाखांच्या मुद्देमालासह नंदुरबार जिल्ह्यातील 5 गुन्ह्यांसह महाराष्ट्रातील 13 असे एकूण 18 गुन्हे उघड, स्थानिक गुन्हे शाखेची क
*सोन्याची चैन हिसकावून चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला बेड्या, 5 लाखांच्या मुद्देमालासह नंदुरबार जिल्ह्यातील 5 गुन्ह्यांसह महाराष्ट्रातील 13 असे एकूण 18 गुन्हे उघड, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी*
नंदूरबार(प्रतिनिधी):-मागील काही दिवसांपासून नंदुरबार तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात सोनसाखळी चोरीचे गुन्हे घडत होते. दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी एकाच दिवशी नंदुरबार शहरात एकापाठोपाठ 2 व महिनाभरानंतर पुन्हा दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी उपनगर पोलीस ठाणे हद्दीत एक तसेच मागील वर्षी देखील नंदुरबार शहर व उपनगर पोलीस ठाणे हद्दीत दोन सोनसाखळी चोरीची घटना घडल्यामुळे धुमस्टाईल सोनसाखळी (चैन स्नॅचिंग) चोरीच्या गुन्ह्यांमधील आरोपीतांना अटक करुन मुद्देमाल हस्तगत करण्याचे आव्हान पोलीसांसमोर होते.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांनी सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेवून गुन्ह्यातील आरोपीतांना निष्पन्न करुन अटक करुन गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याचे व कडक प्रतिबंधक कारवाई करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेला व जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना मासिक गुन्हे बैठकीत निर्देश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी नंदुरबार शहरात घडलेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांचा बारकाईने अभ्यास केला तसेच महाराष्ट्र राज्यात देखील वेगवेगळ्या जिल्ह्यात अशाच प्रकारचे सोनसाखळी चोरीचे गुन्हे घडलेले असून त्याचे CCTV फुटेज प्राप्त झाले. त्यावरून सदर आरोपी व त्यांची गुन्हा करण्याची पध्द्त ही सारखीच असून सदरचा गुन्हा राहूल गायकवाड, अविनाश तिळकर रा. दगडी शहाजानपुर ता.जि. बीड यांनी मिळून केलेला असल्याचे गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशिर माहिती मिळाली, म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करुन सदर आरोपीतांना ताब्यात घेणेबाबत आदेशीत केले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ बीड जिल्हा गाठत बीड शहरात गोपनीय बातमीदारांकडून वरील नमुद आरोपीतांचा शोध घेतला असता दिनांक 26 मे 2026 रोजी सदर आरोपी मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी राहूल राजाराम गायकवाड, वय-22 वर्षे, अविनाश नवनाथ टिळकर, वय-22 वर्षे, दोन्ही रा. दगडी शाहजहानपूर, ता. जि.बीड असे
सांगितले. त्यांना नंदुरबार शहरात घडलेल्या सोनसाखळी चोरीच्या घटनांबाबत विचारपूस केली असता त्यांनी नंदुरबार शहरात सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांबाबत सविस्तर माहिती दिल्याने त्यांना नंदुरबार शहर पोलीस ठाणे 22/ 2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 304(2) प्रमाणे गुन्ह्यात अटक करुन त्यांना नंदुरबार जिल्ह्यात घडलेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांबाबत विचारपूस केली असता त्यांनी नंदुरबार शहरात एकूण 05 वेळा सोनसाखळी चोरीच्या घटना केलेल्या असल्याबाबत कबुली दिल्याने नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचे अभिलेख पाहिले असता खालील प्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे समजुन आले. नंदुरबार शहर पोलीस ठाणे गुरनं. 22/2026 प्रमाणे, उपनगर पोलीस ठाणे गुरनं. 104/2026 प्रमाणे, उपनगर पोलीस ठाणे गुरनं. 211/ 2025 प्रमाणे, उपनगर पोलीस ठाणे गुरनं. 11/ 2026 प्रमाणे नंदुरबार शहर पोलीस ठाणे गुरनं. 136/2025 प्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे दिसून आले. वरील आरोपीतांना नमुद गुन्ह्यातील मुद्देमाल बाबत विचारपूस केली असता त्यांनी वर नमुद गुन्ह्यातील एकूण 4,18,200/- रुपये किंमतीचे वजनाचे सोन्याचे दागिने व 1,25, 000 रुपये किमतीची गुन्हा करतांना वापरलेली मोटार सायकल असा एकूण 5,43, 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांना महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात घडलेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांबाबत विचारपूस केली असता त्यांनी मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील अकोला अमरावती शहर, जळगांव, अहिल्यानगर, सांगली, नाशिक शहर, छ. संभाजीनगर व कर्नाटक राज्यातील बेळगांव शहरात सोनसाखळी चोरीचे गुन्हे हे त्यांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने केलेले असलेबाबत सविस्तर कबुली दिली आहे. त्याबाबत संबंधीत जिल्ह्यात पडताळणी केली असता अकोला- 01, अमरावती शहर-01, जळगांव -02, अहिल्यानगर- 02, सांगली-01, नाशिक शहर-03, छ. संभाजीनगर-01 व बेळगांव शहर कर्नाटक-01 व नाशिक शहरातील पुणे रोडवर मागील 15 ते 20 दिवसापूर्वी देखील सोनसाखळी चोरी केलेबाबत माहिती दिली. असे एकूण 13 गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. ताब्यात घेण्यात आलेला आरोपी राहुल राजाराम गायकवाड व त्याच्या साथीदारांविरुध्द् यापूर्वी सोलापूर शहर येथे 04 सोनसाखळी चोरी व दरोड्याचा गुन्हा दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ताब्यात घेण्यात आलेला आरोपीतांकडून नंदुरबार जिल्ह्यातील 05 व महाराष्ट्रासह कर्नाटक येथील 13 असे एकूण 18 मालमत्तेविरुध्द् गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. कौशल्यपूर्वक तपास करुन जबरी चोरीसारखा मालमत्तेविरुध्द्या आव्हानात्मक गंभीर गुन्हे उघड करुन उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक गुन्हे पथकाचे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांनी अभिनंदन केले आहे. सदरची कामगिरी ही नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उप निरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, पोलीस हवालदार मुकेश तावडे, मनोज नाईक, मोहन ढमढेरे, अभय राजपुत, आनंदा मराठे यांच्या पथकाने केली आहे.



