*महिला महाविद्यालयाचा विद्यापीठ परीक्षेत परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*महिला महाविद्यालयाचा विद्यापीठ परीक्षेत परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी*
*महिला महाविद्यालयाचा विद्यापीठ परीक्षेत परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी*
शहादा(प्रतिनिधी):-येथील सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला व विज्ञान महिला महाविद्यालय, शहादा येथील प्रथम वर्ष कला उन्हाळी द्वितीय सत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून महाविद्यालयाने 79.59 टक्के निकालाची उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत विद्यार्थिनींनी उज्ज्वल यश संपादन करत महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक परंपरेला साजेशी कामगिरी केली आहे. जाहीर झालेल्या निकालात अनेक विद्यार्थिनींनी प्रथम श्रेणी व विशेष प्रावीण्यासह यश मिळविले आहे. यामध्ये पवार तन्वी जगन्नाथ हिने 77.64 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. पिंजारी महेक अजीज हिने 72.18 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर भील रक्षा गंगाराम हिने 70.45 टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक संपादन केला. शहरी भागासह परिसरातील ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाच्या दर्जेदार संधी, कौशल्य विकास आधारित प्रशिक्षण, स्पर्धापरीक्षांचे व नोकरीसंदर्भात निःशुल्क मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य महाविद्यालय सातत्याने करीत असून विद्यार्थिनींच्या या यशामुळे शहादा शहरासह परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थिनींच्या परिश्रम, पालकांचे सहकार्य तसेच प्राध्यापकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन यामुळे हे यश शक्य झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. या यशाबद्दल सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. सुधीर जाधव, सचिव संजय जाधव, सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा आशाताई जाधव, उपाध्यक्षा प्रतिमा जाधव, सचिव वर्षा जाधव, प्रशासकीय प्रमुख प्रा. डॉ. हिमांशू जाधव, समन्वयक संजय राजपूत तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. पाटील यांनी गुणवंत विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. परिसरातील विविध स्तरांतून गुणवंत विद्यार्थिनींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



