ताजा खबरे:
*‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेला नंदुरबार जिल्ह्यात लक्षणीय वेग, जलसाठ्यांची क्षमता वाढणार; शेतकऱ्यांना सुपीक गाळामुळे दुहेरी लाभ*
*सामाजिक बांधिलकी आणि एकजुटीचे आदर्श उदाहरण वडदहसोळ पळसमकर वाडीतील तरुणांनी बांधला श्रमदानातून "गणेश घाट"*
*पाचल-जवळेथर रस्त्या दरम्यान ताम्हाणे फाटा ते तळवडे आंबेवाडी रस्त्याचे काम रखडले, नागरिकांचा आंदोलनाचा इशारा*
*महिला महाविद्यालयाचा विद्यापीठ परीक्षेत परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी*
*डी.आर. हायस्कूलमध्ये दहावीतील गुणवंतांचा गुणगौरव सोहळा संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*सामाजिक बांधिलकी आणि एकजुटीचे आदर्श उदाहरण वडदहसोळ पळसमकर वाडीतील तरुणांनी बांधला श्रमदानातून "गणेश घाट"*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*सामाजिक बांधिलकी आणि एकजुटीचे आदर्श उदाहरण वडदहसोळ पळसमकर वाडीतील तरुणांनी बांधला श्रमदानातून "गणेश घाट"*

  • Share:

*सामाजिक बांधिलकी आणि एकजुटीचे आदर्श उदाहरण वडदहसोळ पळसमकर वाडीतील तरुणांनी बांधला श्रमदानातून "गणेश घाट"*
वडदहसोळ(प्रतिनिधी):-राजापूर तालुक्यातील मौजे वडदहसोळ गावातील पळसमकर वाडीतील तरुणांनी श्रद्धा आणि एकजुटीच्या बळावर मुचकुंदी नदीवर श्रमदानाने महत्वाकांक्षी "गणेश घाट". बांधत इतर गावातील तरुणां समोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे. या मोहिमेत सहभागी झालेल्या धडपड्या तरुणांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. 'गणपती बाप्पा मोरया' टीमच्या  माध्यमातून मुंबईकर, ग्रामस्थ आणि महिलांच्या सामूहिक प्रयत्नांतून विकासात्मक दृष्टिकोनाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. शनिवार दि. 16 मे 2026 रोजी संपूर्ण दिवस गणपती बाप्पा मोरया टीम (मुंबईकर तरुण) आणि ग्रामस्थ- महिलांच्या श्रमदान आणि अंग मेहनतीतून मुचकुंदी नदीवर कोकणातील प्रशस्त जांभा दगड रचत महत्वाकांक्षी "गणेश घाट" बांधण्यात आला. त्यासाठी सत्तर-पंच्याहत्तरीहून अधिक व्यक्तींनी एकत्र येत या सत्कार्यात मोलाचे योगदान दिले. पूर्व परंपरागत पळसमकर वाडीतील मर्यादित 65 हून अधिक घरगुती गणेशमुर्ती मुचकुंदी नदी पात्रात विसर्जित केल्या जात आहेत. विसर्जन स्थळ वाडीपासून जवळ जवळ 2 ते 2.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. पूर्वी डोंगरातून घसरत्या पायवाटेवरून चालत चालत बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करावे लागत होते. मात्र कालांतराने गणपती टोना पर्यत डांबरीकरण रस्ता झाला. त्यामुळे बाप्पाचा निरोप मिरवणूक सोयीस्कर झाली. परंतु गणपती टोणा ते मुचकुंदी नदी तट पर्यंतचा 600/800 मीटरचा रस्ता- पायवाट अतिशय खराब परिस्थितीत होता. त्यासाठी ग्रामस्थांकडून अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे मागणी देखील करण्यात आली. परंतु सण संपला तसा विषय देखील संपायचा. याच पार्श्वभूमीवर, प्रति घरटी मुंबईकर- ग्रामीण तरुण मंडळी सोशल मीडिया माध्यमातून एकत्र येत गणपती विसर्जन रस्ता/पायवाट दुरुस्ती मोहीमेची  नियोजनबद्द आखणी केली गेली. श्रमदानातुन आणि स्व-निधीतुन पायवाट आणि गणेश घाट बांधणी संदर्भात आवाहन करण्यात आले. याच दरम्यान वडदहसोळ ग्रामपंचायत सन्मा. सरपंच विजय घाडये यांच्या प्रयत्नातून गणपती टोणा ते परूळेकरदेसाई यांच्या मळ्यापर्यंत डांबरीकरण आणि तिथून पुढे मुचकुंदी नदी पर्यत खडीकरण झाले. मात्र नदीच्या तोंडाजवळ गणेश घाट नसल्याने विसर्जन प्रसंगी अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार होते. पावसाळ्यात त्यापुढील वाट निसरडी अरुंद नि अडचणीची होती. यापूर्वी आपत्ती सदृश्य घटना देखील घडल्या. मात्र यापुढे घसरणीने दुर्घटना घडू नये आणि विसर्जनात कोणतीही बाधा येऊ नये यासाठी ग्रामस्थ आणि गणेश भक्तांनी सदर मोहिमेत स्वयंस्फूर्ती विचाराने सहभाग नोंदवला. यासाठी प्रथमच मौजे वडदहसोळ (राजापूर) पळसमकर वाडीतील मुंबईकर तरुण मंडळी एकत्र येत "पायवाट/रस्ता दुरुस्ती मोहीम राबवत सदर ठिकाणी गणेश घाट बांधण्याचा यशस्वी प्रयत्न केला. एकजुटीच्या बळावर आणि श्रमदानातून गणेश घाट झाल्याने आता कायमचेच हाल संपलेत. सदर सामाजिक उपक्रम एकजुटीतुन सहजच साकारता येतो ही प्रशंसनीय  बाब सर्वदूर पोहचत आहे. सामाजिक माध्यमांवर सर्वांच्या अंगमेहनतीचे आणि एकजुटीने कौतुक होतेय. तशा एक लाखाहून अधिकांच्या सुंदर प्रतिक्रिया आणि टीमसाठी शुभेच्छा मिळत आहेत. यापुढील रस्ता डांबरीकरण आणि प्रशस्त "गणेश घाट" बांधणीसाठी शासनाने निधी मंजूर करावा अशी देखील मागणी टीमच्या माध्यमातून पुढे होणार आहे. श्रमदान करतेवेळी समस्त पळसमकर वाडीतील (घरटी प्रमाणे - नदीवर गणपती विसर्जन करणारे) स्थानिक जेष्ठ आणि जाणकार मंडळी, महिला आणि मुंबईकर चाकरमनी यांच्या सहयोगातून हा सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पूर्णत्वास गेला. त्यामुळे यंदा विसर्जन स्थळी लहान लेकरांना देखील थेट बाप्पाला अखेरचा निरोप देता येऊ शकेल. एकूणच यावर्षीचा गणेशोत्सव अतिशय धुमधडाक्यात करण्यास बाप्पा सर्वाना सद्बुद्धी आणि आशीर्वाद देवो. अशीच एकी आणि सामाजिक बांधिलकी जोपासू! पुढे वाडीच्या विकास कामात एकविचाराने नवा आध्याय घडवू! असा विश्वास यातून वृध्दींगत होत आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेला नंदुरबार जिल्ह्यात लक्षणीय वेग, जलसाठ्यांची क्षमता वाढणार; शेतकऱ्यांना सुपीक गाळामुळे दुहेरी लाभ*
June, 01 2026
*सामाजिक बांधिलकी आणि एकजुटीचे आदर्श उदाहरण वडदहसोळ पळसमकर वाडीतील तरुणांनी बांधला श्रमदानातून "गणेश घाट"*
June, 01 2026
*पाचल-जवळेथर रस्त्या दरम्यान ताम्हाणे फाटा ते तळवडे आंबेवाडी रस्त्याचे काम रखडले, नागरिकांचा आंदोलनाचा इशारा*
June, 01 2026
*महिला महाविद्यालयाचा विद्यापीठ परीक्षेत परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी*
June, 01 2026
*डी.आर. हायस्कूलमध्ये दहावीतील गुणवंतांचा गुणगौरव सोहळा संपन्न*
June, 01 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज