*उन्हाळी सुट्टीत सिंधुदुर्गात रिक्षाचालकांची मनमानी, प्रवाशांचे हाल,प्रशासनाचे दुर्लक्ष*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*उन्हाळी सुट्टीत सिंधुदुर्गात रिक्षाचालकांची मनमानी, प्रवाशांचे हाल,प्रशासनाचे दुर्लक्ष*
*उन्हाळी सुट्टीत सिंधुदुर्गात रिक्षाचालकांची मनमानी, प्रवाशांचे हाल,प्रशासनाचे दुर्लक्ष*
सिंधुदुर्ग(प्रतिनिधी):-कणकवली, नांदगाव, देवगड येथे एप्रिल, मे उन्हाळी सुट्टीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात गावी येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढली आहे. मात्र, एसटी बसेसची संख्या मर्यादित असल्याने नाईलाजाने प्रवाशांना रिक्षाचा आधार घ्यावा लागत आहे. या संधीचा गैरफायदा घेत अनेक रिक्षाचालक अवास्तव भाडे आकारत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.नऊ आसनी रिक्षामध्ये मिळतील तेवढे प्रवासी कोंबून नेले जातात. त्यावर सामानाचे अतिरिक्त ओझे. यामुळे विशेषतः महिला, लहान मुले आणि वृद्ध प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवल्याने अपघाताचा धोकाही वाढला आहे. मिटरप्रमाणे भाडे, आत गाव असल्यास त्यावरही योग्य भाडे ठरवुन द्यावे व जेवढी आसनव्यवस्था तेवढेच प्रवासी घेतले जावेत जेणेकरून प्रवास आरामदायक होईल व सर्वाना प्रवासी व रिक्षावाले याना योग्य न्याय मिळेल
आरटीओ आणि वाहतूक विभाग याकडे लक्ष देतील का? प्रवाशांची मागणी आहे की, सरकारने यात तातडीने लक्ष घालून रिक्षांसाठी निश्चित भाडेदर व प्रवासी संख्या ठरवून द्यावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर कठोर कारवाई करून लोकांचे हाल थांबवावेत. विशेष बाब म्हणजे सध्या मीटर प्रमाणे भाडे आकारले जात नाही किंवा कुठे जाण्यासाठी किती पैसे घेतले जातील याचा काही कुठेही उल्लेख नाही.



