*गोठणे दोनिवडेतील जांगलदेव स्पोर्ट क्लब नाचणेकर वाडी नं 1 चा तरुणाईला सामाजिक कार्याकडे नेण्याचा संकल्प*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*गोठणे दोनिवडेतील जांगलदेव स्पोर्ट क्लब नाचणेकर वाडी नं 1 चा तरुणाईला सामाजिक कार्याकडे नेण्याचा संकल्प*
*गोठणे दोनिवडेतील जांगलदेव स्पोर्ट क्लब नाचणेकर वाडी नं 1 चा तरुणाईला सामाजिक कार्याकडे नेण्याचा संकल्प*
राजापूर(प्रतिनिधी):-तरुणांची शक्ती विधायक कामात लागावी, विचारांना कृतीची जोड मिळावी आणि आपल्या वाडीचे नाव क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उज्ज्वल व्हावे, या उद्देशाने प्रकाश अर्जुन नाचणेकर, सचिन भानू नाचणेकर आणि अनिल जयराम नाचणेकर यांच्या संकल्पनेतून सन 2011 मध्ये या क्लबची स्थापना झाली. जांगल देव स्पोर्ट क्लब नाचणेकर वाडी नंबर 1 स्थापन करताना
वाडीतील तरुण एकत्र येऊन सामाजिक उद्दिष्ट साध्य करणे सामाजिक विकासात योगदान देणे सामुहिक विचाराना चालना देणे, एकत्र येण्यामुळे तरुणांमध्ये संवाद वाढवणे, तरुण बदलाचे वाहक आहेत त्यांच्यातील ताकद आणि ऊर्जा सकारात्मक दिशेने नेण्यासाठी तसेच नेतृत्व विकसित करण्यासाठी एकत्र येण्यासाठी मंडळ प्रयत्नशील आहे. प्रत्येक व्यक्तीकडे काहीतरी वेगळे कौशल्य असते. एकत्र आल्यामुळे तरुणांना एकमेकांचे अनुभव आणि ज्ञान मिळते. यामुळे केवळ समाजाचाच नाही, तर व्यक्तीचा स्वतः चाही दृष्टिकोन विस्तारतो आणि व्यक्तिमत्त्व विकास होतो. तरुणांकडे प्रचंड ऊर्जा असते. जर ती ऊर्जेला योग्य दिशा मिळाली नाही, तर ती व्यसनाधीनतेकडे किंवा चुकीच्या मार्गाकडे वळू शकते. 'स्पोर्ट्स क्लब' सारख्या माध्यमांतून ही ऊर्जा खेळाकडे आणि सामाजिक कार्याकडे वळवता येते, ज्यामुळे समाजाचे हित होते. 11 मे 2026 रोजी नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते विजेता संघ गांगेश्वर इलेव्हन, उपविजेता संघ ब्राह्मदेव इलेव्हन या संघाने विजय मिळवला. या स्पर्धेनिमित्त वाडीतील गावकर केशेव नाचणेकर, अर्जुन नाचणेकर, सुनील नाचणेकर,
वाडीतील प्रतिष्ठित व्यक्ती गणेश नाचणेकर (गुरुजी), भानु नाचणेकर, राजू नाचणेकर, भानु राजापकर, प्रकाश भोवड, प्रकाश सौंदलकर, प्रभाकर भामत आणि वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते. वाडीतील स्पर्धा झाल्यानंतर शशिकांत नाचणेकर आणि
शशिकांत सौंदलकर, संतोष नाचणेकर आणि त्यांची टीम यांनी सहभोजनाची व्यवस्था केली होती इतर व्यवस्थापन अनिल नाचणेकर, सुरेश सोड्ये व. यतीन पलसमकर,
जांगल देव स्पोर्ट क्लब नाचणेकरवाडी
मंडळाचे अध्यक्ष संदेश सौंदलकर खजिनदार रुपेश सोड्ये अक्षय सोड्ये शकु समीर सौंदलकर भूषण नाचणेकर कु शुभम नाचणेकर आदींनी केले होते. विशेष सहकार्य
नवतरुन विकास मंडळ मुंबई.
नाचणेकरवाडी ग्राम विकास मंडळ
नाचणेकर वाडी महिला मंडळ जांगल देव स्पोर्ट क्लब सर्व सभासदांना पुढील विधायक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि मार्गदर्शन श्री मनोहर ग नाचणेकर, सचिन भा नाचणेकर यांनी केले त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.



