*नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे शनिवारी "तक्रार निवारण दिनाचे" आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे शनिवारी "तक्रार निवारण दिनाचे" आयोजन*
*नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे शनिवारी "तक्रार निवारण दिनाचे" आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत नागरिकांचे काही तक्रारी/समस्या असल्यास त्याचे लागलीच निवारण होऊन नागरिकांचा वेळ वाचावा व सोशल पोलिसींगचे माध्यमातून जनतेशी संवाद साधता यावा, या उददेशाने प्रत्येक शनिवारी जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये नागरिकांसाठी "तक्रार निवारण दिन" आयोजित करण्यात येत आहे.
त्याअनुषंगाने उदया दि.23 मे 2026 रोजी जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्यात सकाळी 11 ते 1 वाजेदरम्यान तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले असुन नागरिकांनी सदर तक्रार निवारण दिनी उपस्थित राहून आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.



